मला बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का पुसायचाय - सनी लिऑन
By Admin | Updated: February 22, 2016 13:23 IST2016-02-22T10:17:31+5:302016-02-22T13:23:39+5:30
बॉलिवुड अभिनेत्री सनी लिऑनला आपली प्रतिमा बदलायची आहे. तिच्यावर जो हॉट, बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का बसला आहे तो तिला पुसायचा आहे.

मला बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का पुसायचाय - सनी लिऑन
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - बॉलिवुड अभिनेत्री सनी लिऑनला आपली प्रतिमा बदलायची आहे. तिच्यावर जो हॉट, बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का बसला आहे तो तिला पुसायचा आहे. त्यामुळे सनीने यापूर्वी ज्या बोल्ड भूमिका केल्या त्यापेक्षा वेगळया भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनयाला वाव मिळेल आणि अभिनेत्री म्हणून तिची क्षमता दिसेल असे काम करण्याची सनीची इच्छा आहे. मस्तीझादे चित्रपटानंतर माझ्या वाटयाला आणखीं विनोदी भूमिका येतील अशी मला अपेक्षा आहे. माझे आणखी दोन चित्रपट येत आहेत ज्यात माझ्या वेगळया भूमिका आहेत असे सनीने सांगितले.
पटकथा वाचल्यानंतर त्यात माझ्या भूमिकेला वाव असेल तर, चित्रपटात काम करण्याचा उत्साह वाढतो असे सनीने सांगितले. बॉलिवुडमध्ये काम करत असताना व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखणे कठिण जात असल्याचे सनीने सांगितले.