मी 125 दिवस सुट्टय़ा घेतो

By Admin | Updated: September 3, 2014 23:30 IST2014-09-03T23:30:57+5:302014-09-03T23:30:57+5:30

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी टीव्ही शोसाठी काम करीत आहे. एवढय़ा बिझी लाईफमध्येही तो त्याच्या कुटुंबियांना पूर्ण वेळ देताना दिसतो.

I take 125 days a week | मी 125 दिवस सुट्टय़ा घेतो

मी 125 दिवस सुट्टय़ा घेतो

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी टीव्ही शोसाठी काम करीत आहे. एवढय़ा बिझी लाईफमध्येही तो त्याच्या कुटुंबियांना पूर्ण वेळ देताना दिसतो. हे सर्व मॅनेज करणो खूपच सोपे काम असल्याचे अक्षय म्हणतो. अक्षय म्हणतो, ‘मी गेल्या 24 वर्षापासून बॉलीवूडमध्ये काम करीत आहे. कोणत्याही कारणामुळे मला माङो काम सोडून द्यायला हवे, असे मला वाटत नाही. इंडस्ट्रीत मी सर्वात जास्त सुट्टय़ा घेतो आणि वर्षभरात तीन ते चार चित्रपट सहज करू शकतो. मला या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बराच ब्रेक मिळतो. एक चित्रपट जवळपास 6क् दिवसांत बनतो. या हिशेबाने चार चित्रपट बनवण्यासाठी 24क् दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळे मला जवळपास 125 दिवसांच्या सुट्टय़ा मिळतात.’ यावर्षी अक्षयचा हॉलीडे आणि एंटरटेनमेंट हे चित्रपट रिलीज झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्याचा शौकीन हा चित्रपट रिलीज होत आहे. त्याशिवाय डेअर टू डान्स हा त्याचा टीव्ही शोही लवकरच सुरू होतोय.

 

Web Title: I take 125 days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.