‘मला अजूनही सोनाक्षी आवडते’
By Admin | Updated: April 23, 2017 00:21 IST2017-04-23T00:21:01+5:302017-04-23T00:21:01+5:30
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा

‘मला अजूनही सोनाक्षी आवडते’
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा बरीच रंगली होती. यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली. चर्चा खरी मानाल, तर अर्जुन आणि सोनाक्षी दोघेही दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. अर्थात, आता दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. ‘तेवर’ चित्रपटात अर्जुन व सोनाक्षीने एकत्र काम केले होते. तेथूनच दोघांमध्ये पे्रम फुलल्याचे मानले जाते. ब्रेकअपनंतर अनेकदा दोघांचा आमनासामना झाला. पण प्रत्येक वेळी सोनाक्षी व अर्जुन मागचे सगळे काही विसरून अगदी सामान्यपणे परस्परांना भेटताना दिसले.
अलीकडे एका मुलाखतीत अर्जुन सोनाक्षीबद्दल बोलला. मला अजूनही सोनाक्षी आवडते, हे त्याने प्रामाणिकपणे कबूल केले. एक चांगली व्यक्ती म्हणून मला ती आवडते. आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा आधीसारखेच वागतो, असे तो म्हणाला. काही नाती कायम राहतात- काही नाही, असेही तो म्हणाला.