खुदा भी नहीं जानता सलमान कब शादी करेगा - सलीम खान
By Admin | Updated: August 15, 2016 03:29 IST2016-08-15T03:29:30+5:302016-08-15T03:29:30+5:30
सुपरस्टार सलमान खान केव्हा लग्न करेल, हे साक्षात परमेश्वराही ठाऊक नाही.

खुदा भी नहीं जानता सलमान कब शादी करेगा - सलीम खान
होय, हे अगदी खरं आहे. सुपरस्टार सलमान खान केव्हा लग्न करेल, हे साक्षात परमेश्वराही ठाऊक नाही. हे आम्ही नाही तर सलमानचे पिता सलीम खान यांचे म्हणणे आहे. सुप्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान एक रेडिओ शो होस्ट करताना दिसणार आहेत. खुद्द सलीम यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली. मी रेडिओ शो होस्ट करणार आहे. पण कृपया शो दरम्यान मला सलमानच्या लग्नाबाबत कुठलाच प्रश्न विचारू नका. तो कधी लग्न करणार, हा प्रश्न सोडून तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता. कारण तो कधी लग्न करणार हे खुद्द परमेश्वरालाही ठाऊक नाही, असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. त्याच्या लग्नाची बातमी ऐकण्यास सगळे आतूर आहोत. पण सलीम यांची विनंतीही मान्य करायलाच हवी ना !