‘मैं और चार्ल्स’ एक आव्हान
By Admin | Updated: October 29, 2015 00:20 IST2015-10-29T00:20:17+5:302015-10-29T00:20:17+5:30
रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचा आगामी चित्रपट ‘मैं और चार्ल्स’ म्हणजे एक आव्हान आणि चांगली सुरुवात होती असे म्हटले जात आहे.

‘मैं और चार्ल्स’ एक आव्हान
रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांचा आगामी चित्रपट ‘मैं और चार्ल्स’ म्हणजे एक आव्हान आणि चांगली सुरुवात होती असे म्हटले जात आहे. अशी केवळ चर्चा नसून खुद्द रणदीप हुडा म्हणतोय. रणदीप चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना म्हणतो, ‘माझी भूमिका अत्यंत वेगळी आहे. माझ्या भूमिकेला अनेक व्हिजन्स आहेत. खरं तर हा रोल माझ्यासाठी आव्हानात्मक होता. चित्रपट साकारणे म्हणजे माझ्यासाठी एक व्हिक्टरीच आहे. मी माझ्या भूमिकेला ओळखले त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात आणखी भर पडली.