अबरामचा मीच बाप, आजोबा नाही...शाहरुख भडकला

By Admin | Updated: May 12, 2017 13:47 IST2017-05-12T13:35:30+5:302017-05-12T13:47:28+5:30

अभिनेता शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम जन्मापासूनच प्रसिद्धीझोतात आला आहे. 27 मे 2013 रोजी सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला. तेव्हापासून तो सतत चर्चेत असतो.

I am not a father, grandfather ... Shahrukh shocked | अबरामचा मीच बाप, आजोबा नाही...शाहरुख भडकला

अबरामचा मीच बाप, आजोबा नाही...शाहरुख भडकला

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अभिनेता शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम जन्मापासूनच प्रसिद्धीझोतात आला आहे. 27 मे 2013 रोजी सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला. तेव्हापासून तो सतत चर्चेत असतो. किंग खानचा लाडका मुलगा अबराम हा त्याचाच मोठा मुलगा आर्यन याच्यापासून जन्माला आल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. या चर्चेला आता खुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला असून, अशा चर्चा दुखदायक असल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे.
टेड टॉक शोमध्ये शाहरुखने उपस्थिती दर्शवत मनमोकळ्य़ा गप्पा मारल्या. या शोमध्ये सहभागी होणारा तो पहिलाच कलाकार ठरला. यादरम्यान त्याने आपल्या लेक्चरमध्ये अनेक उल्लेखनीय अशा बाबींवर मत व्यक्त करून उपस्थितांची प्रशंसा मिळविली. आपल्या करिअरसह खासगी आयुष्यावरही त्याने मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. यावेळी त्याने सोशल मीडियावर अबरामविषयी पसरविण्यात येत असलेल्या चर्चांचेही खंडन केले. जेव्हा अबरामचा जन्म झाला होता, तेव्हा हा शाहरूखचा मुलगा नसून, शाहरूखचाच मोठा मुलगा आर्यनचा असल्याची चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर चेन्नई एक्स्प्रेसच्या रिलीजअगोदर आर्यनचा एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये आर्यन एका कारमध्ये रोमानियन मुलीबरोबर सेक्स करताना दिसत होता. तेव्हापासून हे म्हटले जात होते की, अबराम हा आर्यनचाच मुलगा आहे. याविषयी शाहरूखने टेड टॉक शोमध्ये चुप्पी तोडत यामागचे वास्तव कथन केले.
शाहरूखने म्हटले की, चार वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी गौरी हिने तिसऱ्या मुलाबाबत विचार केला. मात्र इंटरनेटच्या उपकारामुळे अबराम माझ्या 15 वर्षांचा मुलगा आर्यनचा मुलगा असल्याचे सांगितले गेले. त्याचा पुरावा म्हणून आर्यनचा त्याच्या रोमानियन गर्लफ्रेण्डसोबत सेक्स करतानाचा व्हिडीओही त्यावेळी व्हायरल केला गेला. आम्ही सर्वांनी हा व्हिडीओ बघितला तेव्हा खूपच दु:ख वाटले. या सगळ्या अफवा असून, त्या निराधार असल्याचेही शाहरूखने म्हटले.


वास्तविक शाहरूख त्याच्या सर्वच मुलांच्या खूप क्लोज आहे. आर्यन आणि सुहानाला तर तो प्रेमाने ब्रो असे बोलावतो. तो मुलांसोबत मित्रांप्रमाणे वागतो. सध्या शाहरूखचे सुहाना आणि आर्यन ही दोन मुले मोठी झाली असली तरी, त्यांची जागा आता अबरामने घेतली आहे. त्यामुळेच आर्यन आणि सुहानापेक्षा अबराम शाहरूखच्या सर्वाधिक क्लोज आहे. अबराम हा प्री मॅच्योर बेबी आहे. जेव्हा अबरामचा जन्म होणार होता, तेव्हा शाहरूखवर सेक्स डिटमिनेशन टेस्टचे आरोप लावण्यात आले होते.

Web Title: I am not a father, grandfather ... Shahrukh shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.