मलाही पहायचाय ' अझर' - नौरीन

By Admin | Updated: May 18, 2016 11:29 IST2016-05-18T10:07:15+5:302016-05-18T11:29:42+5:30

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावरील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, मात्र त्याची पहिली पत्नी नौरीनने तो अद्याप पाहिलेला नाही.

I also want to see 'Azhar' - Naurin | मलाही पहायचाय ' अझर' - नौरीन

मलाही पहायचाय ' अझर' - नौरीन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावरील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे बरेच कौतुक होत आहे. तिकीटबारीवरही चित्रपटाने चांगला गल्ला गमावला आहे, मात्र अझरची पहिली पत्नी नौरीन हिने मात्र अद्याप हा चित्रपट पाहिलेला नसून तो लवकरात लवकर पाहण्याची तिची इच्छा आहे. 
' या चित्रपटात प्राचीने (देसाई) माझी भूमिका कशी रंगवली आहे ते मला पहायचं आहे. मला कधी चित्रपट पाहता येईल ते माहीत नाही, पण जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तो नक्कीच बघेन' असे नौरीनने म्हटले आहे. २००० साली आमचा घटस्फोट झाल्यानंतर अझरचे व्यक्तिमत्व खूप बदलले आहे आणि म्हणूनच मला हा चित्रपट पहायचा आहे, असेही नौरीनने सांगितले.
या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना कितपत ख-या आहेत, असे तिला विचारले असता ' मी अद्याप हा चित्रपट पाहिला नसल्याने मी त्यावर भाष्य करू शकत नाही. मात्र मी तेव्हा निष्पाप होते आणि माझा अझरवर खूप विश्वास होता' असे नौरीनने सांगितले. ' काही दिवसांपूर्वी मी यू-ट्यूबवर चित्रपटाता ट्रेलर पाहिला आणि त्यात एका सीनमध्ये अझरने आपले शतक संगीताला (बिजलानी- अझरची दुसरी पत्नी) समर्पित केल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र हे अजिबात खरे नाही. मी त्या घरात असेपर्यंत तरी अझरने असा कोणताही उल्लेख केला नव्हता ' असेही नौरीनने स्पष्ट केले. 

Web Title: I also want to see 'Azhar' - Naurin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.