हुमा करणार २0१८ मध्ये लग्न

By Admin | Updated: June 23, 2014 11:12 IST2014-06-23T11:12:25+5:302014-06-23T11:12:33+5:30

‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्‍या हुमा कुरेशीचे नाव अनुराग कश्यप आणि शाहीद कपूर यांच्याशी जोडले गेले आहे; परंतु या नात्याबाबत हुमाने मौनच बाळगले आहे.

Huma will marry in 2018 | हुमा करणार २0१८ मध्ये लग्न

हुमा करणार २0१८ मध्ये लग्न

>‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्‍या हुमा कुरेशीचे नाव अनुराग कश्यप आणि शाहीद कपूर यांच्याशी जोडले गेले आहे; परंतु या नात्याबाबत हुमाने मौनच बाळगले आहे. काही दिवसांपूर्वी हुमा इटलीच्या दौर्‍यावर होती. त्यावेळी तिने एका ज्योतिषाची भेट घेतली. ज्योतिषासोबतचा फोटोही तिने ‘सोशलसाईट’वर अपलोड केला आहे. २0१८ या वर्षी हुमाचे लग्न होईल, अशी भविष्यवाणी या ज्योतिषाने केली आहे. या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी होती काय, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. अनुराग कश्यप आणि हुमा कुरेशी यांच्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे. ही जोडी २0१३ या वर्षीच विवाहबद्ध होणार होती; परंतु माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. 

Web Title: Huma will marry in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.