‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ला उदंड प्रतिसाद

By Admin | Updated: October 30, 2015 01:19 IST2015-10-30T01:19:31+5:302015-10-30T01:19:31+5:30

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्र्णीबरोबरच फ्रेश चेहऱ्याचे प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून,

A huge response to 'Rajwade and Sons' | ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ला उदंड प्रतिसाद

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ला उदंड प्रतिसाद

पुणे : ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्र्णीबरोबरच फ्रेश चेहऱ्याचे प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून, अमित्रियान या चित्रपटाचा ‘सरप्राइज’ पॅकेज ठरला आहे.
मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी ही मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतली एक आघाडीची फळी. त्यांच्या कारकिर्दीतली त्यांची चढती कमान आपण प्रेक्षक म्हणून पाहिलीच आहे. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल, सचिन आणि अतुल हे तिघेही प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहेत आणि ते ही चक्क सख्खी भावंडे म्हणून.
मराठीला अमित्रियानच्या रूपात एक नवा, दमदार आणि देखणा चेहरा मिळाला आहे, असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ ही गोष्ट आहे आयुष्यात काळाप्रमाणे बदल होत असतानाच्या गंमतीशीर, खऱ्या क्षणांची. सिद्धार्थ मेनन, कृतिका देव, मृण्मयी गोडबोले आणि आलोक राजवाडे ही तरुण मंडळी राजवाडेच्या शूटविषयी खूप एक्साइट होऊन बोलत होती.
पुण्यात अतिशय गंभीरपणे नाटक करणारी ही चारही तरुण मुले नव्या तरुण पिढीची प्रतिनिधी आहेत. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ च्या निमित्ताने ही गुणवंत पुणेकर मंडळी एकत्र कल्ला करताना दिसली.
नवीन पिढीला जुन्या पिढीतल्या आवडणाऱ्या गोष्टी बरोबर घेऊन पुढे जायची इच्छा आहे. तुमचे चांगले गाठीशी घेऊन आम्हाला आमची वाट शोधू द्या. राजवाड्यांच्या नातवंडांची हिच ‘तगमग’ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A huge response to 'Rajwade and Sons'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.