पुन्हा यशराज सोबत हृतिक
By Admin | Updated: December 4, 2014 08:36 IST2014-12-04T04:47:29+5:302014-12-04T08:36:46+5:30
अभिनेता हृतिक रोशन आशुताष गोवारीकरच्या 'मोहेंजोंदडो' या चित्रपटाच्या प्रि प्रोडक्शनच्या कामात सध्या व्यग्र आहे. आता ताजी बातमीअशी की त्याला एक नवा चित्रपट मिळाला

पुन्हा यशराज सोबत हृतिक
अभिनेता हृतिक रोशन आशुताष गोवारीकरच्या 'मोहेंजोंदडो' या चित्रपटाच्या प्रि प्रोडक्शनच्या कामात सध्या व्यग्र आहे. आता ताजी बातमीअशी की त्याला एक नवा चित्रपट मिळाला असून या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन "धुम ३' चा दिग्दर्शक कृष्णा आचार्य करणार आहे. सुत्रांनुसार यशराज फिल्मला हृतिकवर नेहमीच विश्वास राहिला आहे, हृतिकही या बॅनरबाबत सकारात्मक असतो. या चित्रपटाबाबतही तो सकारात्मक असल्याचे कळते पण त्याने हा चित्रपट अद्याप साईन केलेला नाही.