सलमानचा बॉडीगार्ड "शेरा"चा पगार किती माहितीये का?

By Admin | Updated: May 12, 2017 08:02 IST2017-05-12T06:58:38+5:302017-05-12T08:02:43+5:30

बॉलिवूडचा सुपरस्‍टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सलमानमुळे नेहमी चर्चेत असतो. तो स्वतःही कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये.

How much does Salman's Bodyguard "Let's Pay"? | सलमानचा बॉडीगार्ड "शेरा"चा पगार किती माहितीये का?

सलमानचा बॉडीगार्ड "शेरा"चा पगार किती माहितीये का?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बॉलिवूडचा सुपरस्‍टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सलमानमुळे नेहमी चर्चेत असतो. तो स्वतःही कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये. शेरा गेल्या वीस वर्षांपासून सलमानचा खास बॉडीगार्ड आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी शेरा किती पैसे आकारतो हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
 
बिझनेस ऑफ सिनेमाने दिलेल्या वृत्तानुसार सलमान शेराला दरमहिन्याला 15 लाख रूपये पगार देतो. म्हणजे शेरा वर्षाला तब्बल 2 कोटी रूपये कमावतो. शेराची स्वतःची सिक्युरिटी कंपनीही आहे. अर्थात सलमानची सुरक्षा करण्याचं काम तितकंच कठीणही आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्यात सलमानच्या गाडीला चाहत्यांनी गराडा घातला, गाडी जागची हालणंही कठीण झालं होतं. त्यावेळी सुरक्षेची सुत्रं आपल्या हाती घेत शेरा गाडीखाली उतरला आणि गर्दी हटवली. पुढे तब्बल 8 किलोमीटरपर्यंत चालत त्याने गाडीपासून चाहत्यांना लांब ठेवलं आणि सलमानला सुरक्षित सोडवलं होतं. शेरा सलमानच्या तितक्याच जवळचा आहे, सलमानसोबत जवळपास सर्वच कार्यक्रमांना शेरा असतो.  सलमान शेरासोबत आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच राहतो. 
 
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर सलमान लवकरच शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. यापुर्वी आपला सुपरहीट सिनेमा "बॉडीगार्ड" त्याने शेराला समर्पित केला होता.  
 
वयाच्या बाराव्या वर्षीच सुपरस्टार बनलेल्या कॅनडियन पॉप सिंगर जस्टीन बीबर नुकताच मुंबईत आला त्यावेळी बीबरनं स्वत:चे बॉडीगार्ड तर सोबत आणले होतेच. पण सोबतच त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी शेराकडेच देण्यात आली होती. 

Web Title: How much does Salman's Bodyguard "Let's Pay"?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.