चित्रपटसृष्टीतील समर्पित योगदानाचा सन्मान - मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 29, 2014 05:50 IST2014-12-29T05:50:38+5:302014-12-29T05:50:38+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्व खूप मोठे असून, आजचा त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील समर्पित योगदानाचा सन्मान आहे,

Honor for the contribution of the film industry - Chief Minister | चित्रपटसृष्टीतील समर्पित योगदानाचा सन्मान - मुख्यमंत्री

चित्रपटसृष्टीतील समर्पित योगदानाचा सन्मान - मुख्यमंत्री

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्व खूप मोठे असून, आजचा त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील समर्पित योगदानाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्टच्या वतीने यंदाचा पहिला दादासाहेब फाळके जीवन गौरव मानकरी पुरस्कार लीला गांधी यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद
तावडे, दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्टच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री दीपाली सय्यद, संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अ‍ॅड. मोहन पिंपळे, विश्वस्त कृष्णा पिंपळे, या ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कांबळे, हेमंत निगम आदी मान्यवर उपस्थित होते.
लीला गांधी यांचा सन्मान करण्याचा मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगून त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद,
सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन यांसारख्या विविध विभागांतील पुरस्कारही देण्यात
आले. (प्रतिनिधी)

Web Title: Honor for the contribution of the film industry - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.