हनी सिंहच्या ‘कॉन्सर्ट’मध्ये हंगामा

By Admin | Updated: May 29, 2014 15:11 IST2014-05-29T15:00:21+5:302014-05-29T15:11:16+5:30

यो यो हनी सिंह जेथे जातो, तेथे काही तरी धिंगाणा घालतोच. रविवारी जयपूरमध्ये आयोजित एका ‘कॉन्सर्ट’मध्ये त्याचे जोरदार भांडण झाले

Honey Singh's concert in ruckus | हनी सिंहच्या ‘कॉन्सर्ट’मध्ये हंगामा

हनी सिंहच्या ‘कॉन्सर्ट’मध्ये हंगामा

>यो यो हनी सिंह जेथे जातो, तेथे काही तरी धिंगाणा घालतोच. रविवारी जयपूरमध्ये आयोजित एका ‘कॉन्सर्ट’मध्ये त्याचे जोरदार भांडण झाले. हनी सिंह आयोजकांवर जाम भडकला आणि शो सोडून जायला निघाला. हा कार्यक्रम अडीच तास उशिरा सुरू झाला. हनी सिंहच्या फॅन्सची गर्दी ओसंडली होती. हनी सिंह आयोजकांच्या व्यवस्थेवर जाम नाराज झाला. यामुळे तो आयोजकांवर फार ओरडला. यो यो म्हणाला की, तो पुन्हा या आयोजकांसोबत कधीच काम करणार नाही. यो यो ने गायला सुरुवात केल्यावर जमावाने सुरक्षा भेदून त्याच्याकडे धाव घेतली. परिस्थिती अतिशय बिघडल्यामुळे पोलिसांचा ताफाच बोलवावा लागला. हनी सिंह मात्र प्रेक्षकांना विनवण्या करून थकला होता. शेवटी त्यानेच त्याच्या फॅन्सला सांभाळून घेतले.

Web Title: Honey Singh's concert in ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.