हॉलीवूडला मराठी चित्रपटांची भुरळ

By Admin | Updated: August 17, 2015 10:29 IST2015-08-17T00:00:23+5:302015-08-17T10:29:37+5:30

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगल्या व विविधांगी विषयांवर चित्रपटनिर्मिती करण्याची परंपरा आहे. इतक्या वर्षातील केवळ विनोदीपुरता मर्यादित राहिलेला चित्रपट आता

Hollywood's love for Marathi films | हॉलीवूडला मराठी चित्रपटांची भुरळ

हॉलीवूडला मराठी चित्रपटांची भुरळ

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगल्या व विविधांगी विषयांवर चित्रपटनिर्मिती करण्याची परंपरा आहे. इतक्या वर्षातील केवळ विनोदीपुरता मर्यादित राहिलेला चित्रपट आता त्यातून बाहेर पडला आहे. नुसताच बाहेर नाही तर मराठी चित्रपटाने मुंबई, महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता थेट परदेशातही झेप घेतली आहे. त्यामुळे केवळ बॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूडलाही सध्या मराठी चित्रपट भुरळ घालत आहेत. हॉलीवूडची ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही नामांकित कंपनी ‘परतु’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे. या चित्रपटाचे गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ दाखवण्यात आला असून, प्रेक्षकांना अजून एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट यानिमित्ताने पाहता येणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ‘परतु’ चित्रपटाचे थीम साँग गायले असून, ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतु’ला पार्श्वसंगीत दिले आहे.

Web Title: Hollywood's love for Marathi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.