रायन गोस्लिंग आणि हॅरिसन फोर्डच्या ‘ब्लेड रनर २०४९’चे अल्टीमेट टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:13 IST2016-12-22T17:13:28+5:302016-12-22T17:13:28+5:30

‘ब्लेड रनर २’चे पहिले टीझर यूट्यूबवर शेअर करण्यात आले. ‘ब्लेड रनर’चा हा सिक्वेल भारतात ६ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रायन गोस्लिंग आणि हॅरिसन फोर्ड या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Ryan Gossling and Harrison Ford's 'Blade Runner 2049' Ultimate Teaser | रायन गोस्लिंग आणि हॅरिसन फोर्डच्या ‘ब्लेड रनर २०४९’चे अल्टीमेट टीझर

रायन गोस्लिंग आणि हॅरिसन फोर्डच्या ‘ब्लेड रनर २०४९’चे अल्टीमेट टीझर

्वोत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपट म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘ब्लेड रनर’चा सिक्वेल ‘ब्लेड रनर २०४९’चे टीझर अखेर इंटरनेटवर दाखल झाले. रायन गोस्लिंग आणि हॅरिसन फोर्ड अभिनित या चित्रपटाची पहिली झलक पाहून मूळ चित्रपटाचा फील येतो असेच म्हणावे लागेल. 

‘सिकारिओ’ आणि यावर्षीच्या ‘अराईव्हल’ सारखे व्हिज्युअली अप्रतिम चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक डेनिस व्हिलेन्यूव्ह ‘ब्लेड रनर २०४९’सह पुन्हा एकदा कमाल करण्यास सज्ज झाला आहे. टीझरमध्ये मूळ चित्रपटाचे थंड, धुक्याने आच्छादित आणि आयकॉनिक निआॅन प्रकाशात न्हाऊ न निघालेले वातावरण निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे असे दिसते.

नावाप्रमाणे या सिक्वेलचे कथानक मूळ चित्रपटाच्या ३० वर्षांनंतर २०४९ साली घडते. लॉस एंजिलिस पोलिस विभागात रायन गोस्लिंग ‘आॅफिसर के’ नावाचा नवीन ब्लेड रनर म्हणून भरती होतो. त्याला अशा गोष्टी माहिती पडतात की, जिच्यामुळे आधीच विस्कटलेली समाजाची घडी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.

                                        

मग तो ३० वर्षांपासून फरार रिक डेकार्डचा (हॅरिसन फोर्ड) शोध घेऊ लागतो. चित्रपटात जेरेड लेटो, रॉबिन राईट, डेव्ह बौटिस्टा आणि मॅकेन्झी डेव्हिस यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या ‘ब्लेड रनर’चे लेखक हॅम्पटन फँचर आणि डेव्ह ग्रीन यांनीच सिक्वेलची पटकथा लिहिली आहे. पुढील वर्षी ७ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे.

एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक डेनिस यांनी सांगतले की, ‘गेल्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाची शूटींग पूर्ण झालेली असून सध्या एडिटिंगवर काम केले जात आहे. माझे निर्माते मला विनोदाने नेहमी आठवण करून देतात की, आमचा चित्रपट ‘आर’ (प्रौढ) श्रेणीतील सर्वात महाग चित्रपटांपैकी एक असणार आहे.’

बिग बजेट सिनेमे अर्थकारण पाहता सहसा सर्व वयोगटाला ध्यानात घेऊन बनवले जातात. परंतु ‘डेडपूल’ सिनेमाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांचे विचार बदलू लागले आहेत. अधिक हिंसक, अधिक बोल्ड चित्रपटही बॉक्स आॅफिसवर रग्गड कमाई करू शकतात असा त्यांना विश्वास वाटू लागला आहे.

Web Title: Ryan Gossling and Harrison Ford's 'Blade Runner 2049' Ultimate Teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.