जेम्सची अशीही अधुरी प्रेमकहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:03 IST2016-11-29T19:49:08+5:302016-11-29T20:03:15+5:30

हॉलिवूड अभिनेता जेम्स मार्सडेन याने त्याच्या प्रेमकहाणीचे काही गुपित उघड केले आहेत. त्याच्या मते तो प्रसिद्ध अभिनेत्री हेलेन मिरेन ...

James's love story ... | जेम्सची अशीही अधुरी प्रेमकहाणी...

जेम्सची अशीही अधुरी प्रेमकहाणी...

लिवूड अभिनेता जेम्स मार्सडेन याने त्याच्या प्रेमकहाणीचे काही गुपित उघड केले आहेत. त्याच्या मते तो प्रसिद्ध अभिनेत्री हेलेन मिरेन हिच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. बºयाचदा तो तिचा पाठपुरावा करायचा. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जेम्सने (४३) मान्य केले की, तो मिरेनकडे (७१) आकर्षित होता. तिच्या विचाराने तो अक्षरश: वेडा झाला होता. त्यामुळे तो सातत्याने तिच्या मागावर असायचा. मिरेन जिथे जाईल तिथे तो तिचा पाठलाग करायचा. 



द एलेन डिजेनर्स शोमध्ये जेम्स त्याची प्रेमकहाणी सांगत  असताना अचानक हेलेन मिरेन यांनी अशी हजेरी लावली. त्यामुळे जेम्सही काही काळ आश्चर्यचकीत झाला होता. 

द एलेन डिजेनर्स शोमध्ये जेम्सने सांगितले की, मी फक्त तिच्यावर मनापासून प्रेम केले आहे अन् करत राहणार. मी आजही तिच्याकडे आकर्षित आहे. एक घटनेचा दाखला देताना तो म्हणाला की, एकदा मी रोमकडे जात होता. प्लेनमधून उतरल्यानंतर माझे सामान घेण्याच्या बहाण्याने मी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती जेव्हा विमानतळावर जात होती, तेव्हा मी तिचा फोटोही काढला. 

या शोमध्ये मिरेनही जेम्ससोबत उपस्थित होती. खरं तर आतापर्यंत जेम्स सार्वजनिकरीत्या मिरेनच्या समोर यायला घाबरत होता. मात्र जेव्हा त्याने तिच्यासोबत स्टेज शेअर केले तेव्हा त्याच्या मनातील बºयाचशा गोष्टींचा उलगडा झाला. मिरेनला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा जेम्सने रोम विमानतळावरील किस्सा सांगितला. मात्र यावर तिने हसतमुखाने प्रतिक्रिया देत जेम्सच्या प्रेमाला साद घातली. 



जेम्सने हेलेन यांचे असे स्वागत केले

तसेच ‘जेम्स हा खूपच गुणी कलाकार असून, मला त्याचा अभिनय आवडतो’, अशा शब्दात त्याचे कौतुकही केले. मिरेनच्या तोंडून होत असलेले कौतुक ऐकून जेम्स भारावून गेला नसेल तरच नवल... 

Web Title: James's love story ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.