​मी कधीच जेम्स बाँड नाही होणार - मायकल फॅसबेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 16:42 IST2016-11-06T16:40:34+5:302016-11-06T16:42:57+5:30

जेव्हापासून डॅनियल क्रेगने जेम्स बॉड सिरीज सोडण्याची घोषणा केली तेव्हापासून नवा बाँड कोण हा सर्वाधिक विचारला जाणार प्रश्न सिनेरसिकांना ...

I will never be James Bond - Michael Fassbender | ​मी कधीच जेम्स बाँड नाही होणार - मायकल फॅसबेंडर

​मी कधीच जेम्स बाँड नाही होणार - मायकल फॅसबेंडर

व्हापासून डॅनियल क्रेगने जेम्स बॉड सिरीज सोडण्याची घोषणा केली तेव्हापासून नवा बाँड कोण हा सर्वाधिक विचारला जाणार प्रश्न सिनेरसिकांना भेडसावत आहे. फेमस ००७ एजंटसाठी अनेक जणांची नावे समोर आली. टॉम हिडलस्टन, ऐडन टर्नर, इड्रीस एल्बा असे एकाहून एक हॉलीवूड सुपरस्टार्सचा त्यामध्ये सामावेश होता.

पण या सर्वात एका नावाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ते नाव म्हणजे मायकल फॅसबेंडर. ‘स्टीव्ह जॉब्स’ स्टार मायकल पुढचा जेम्स बाँड होऊ शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे. स्वत: फॅॅसबेंडरला मात्र बाँड होण्यात मुळीच रस नाही. तो म्हणतो, ‘मी कधीच जेम्स बाँडचा रोल स्वीकारू शकत नाही. सो प्लीज, माझ्या नावाच्या अफवा बंद करा.’

बरं असे काय कारण असू शकते की, फॅसबेंडरला जगातील सर्वात प्रसिद्ध सिक्रेट स्पायची भूमिका करायची नाही? तो सांगतो, ‘डॅनियल क्रेगने ज्यापद्धतीने ही भूमिका केली आहे, त्यानुसार मला नाही वाटत की आमच्या वयाच्या कोण्या अभिनेत्याने बाँड होण्याचा विचार केला पाहिजे. खरं तर या फ्रॅन्चाईजीला एका नव्या तरुण चेहऱ्याची गरज आहे. विशीतील अभिनेत्याला घेऊन पुन्हा पहिल्यापासून बाँडचे विश्व रंगवले पाहिजे.

                               
                                एजंट ००७ : डॅनियल क्रेग आणि मायकल फॅसबेंडर

बाँडविषयीच्या आठवणी शेअर करताना तो म्हणतो, ‘मी बाँडचा फॅन आहे. जगात कोण नाही? बाँडपट पाहून मी मोठा झालो. ती भूमिका करण्याचासुद्धा मी विचार केलेला आहे. पण आता नाही. माझे वय त्यामध्ये अडसर ठरते. काय सांगता काही वर्षे आधी जर मला आॅफर आली असती तर मी आनंदाने ती स्वीकारली असती.

फॅसबेंडरने निर्मात्यांना काही टिप्ससुद्धा दिल्या. त्याच्या मते, रायन गोस्लिंग, जॅक ओ’कॉनेल चांगले बाँड बनू शकतात. शिवाय महिला बाँड का नको? ‘जेन बाँड’ चांगला सिनेमा होऊ शकतो. केवळ ब्रिटिश अ‍ॅक्टर्स नाही तर अमेरिकन कलाकारांनासुद्धा संधी देण्यास काहीच हरकत नाही.

तुम्हाला काय वाटते? फॅसबेंडर बाँड म्हणून शोभून दिसेल? खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. परंतु त्याआधी हा फोटो पाहा आणि मग ठरवा.

                               
                                द नेम इज बाँड, नेक्स्ट बाँड!

Web Title: I will never be James Bond - Michael Fassbender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.