हॉलिवूड पसरली शोककळा, कोरोना झाल्यामुळे निर्माता स्टीव बिंगची 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:02 PM2020-06-23T16:02:33+5:302020-06-23T16:03:46+5:30

सोशल मीडियावरील त्यांचे चाहते श्रद्धांजली देत आहेत.

Hollywood producer steve bing died by suicide after being isolated due to covid19 | हॉलिवूड पसरली शोककळा, कोरोना झाल्यामुळे निर्माता स्टीव बिंगची 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

हॉलिवूड पसरली शोककळा, कोरोना झाल्यामुळे निर्माता स्टीव बिंगची 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचे जगभरातील फॅन्स अजूनही दु:खात आहेत. हॉलिवूडचा निर्माता स्टीव बिंगने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे आयसोलेशनमध्ये होते त्यामुळे ते डिप्रेस झाला होते. 

स्टीव गेल्या बर्‍याच दिवसांपासून ते डिप्रेस होते. स्टीव 55 वर्षांचे होते. रिपोर्टनुसार सोमवारी 1 वाजण्याच्या सुमारास, त्याने लॉस एंजेलिसच्या सेंचुरी सिटी येथील लक्झरी अपार्टमेंटच्या 27 व्या मजल्यावरून उडी मारली, त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

 'द पोलर एक्सप्रेस' आणि 'बियोवुल्फ' सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.  'द पोलर एक्सप्रेस'साठी त्यांनी जवळपास 80 मिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती. 

रिपोर्टनुसार ते बराच काळ आयसोलेशनमध्ये होते. ज्यामुळे ते लोकांना भेटू शकत नव्हते. याच कारणामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. स्टीव बिंग अभिनेत्री आणि मॉडेल एलिझाबेथ हर्लीसोबत रिलेशनशीपमध्ये होते मात्र दोघांचे नातं फारकाळ टिकू शकले नाही. 

Web Title: Hollywood producer steve bing died by suicide after being isolated due to covid19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.