गागाने दिले वैचारिक भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 22:00 IST2016-12-04T22:00:33+5:302016-12-04T22:00:33+5:30

आपल्या स्टायलिश आणि हॉट अंदाजासाठी ओळखली जाणारी लेडी गागा वैचारिक भाषणासाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. त्यातच बौद्ध धर्मगुरू दलाई लामा ...

Gagney gave thoughtful speeches | गागाने दिले वैचारिक भाषण

गागाने दिले वैचारिक भाषण

ल्या स्टायलिश आणि हॉट अंदाजासाठी ओळखली जाणारी लेडी गागा वैचारिक भाषणासाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. त्यातच बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या भेटीनंतर तिच्या विचारात जबदरस्त बदल बघावयास मिळत असून, जीवनाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनही बदलला आहे. नुकतेच तिने ‘प्रेम आणि दयाळूपणामुळे सुसंवाद निर्माण होतो’ असे वक्तव्य करून आध्यात्मिक तथा बुद्धीवादी लोकांना स्वत:कडे आकर्षित केले आहे.
 
आपल्या नवीन जोन या अल्बमच्या प्रमोशनसाठी लंडनमधील वेस्टफिल्ड शॉपिंग सेंटर येथील कार्यक्रमात फॅन्सला उद्देशून ती बोलत होती. यावेळी तिने मांडलेल्या विचारामुळे फॅन्सही भारावून गेले. तिच्या संपूर्ण भाषणादरम्यान कोणीही आवाज केला नाही. सर्व हॉल स्तब्ध झाला होता. गागाचे प्रगल्भ विचार काही मिनिटांतच फॅन्सकडून सोशल मीडियावर शेअरही करण्यात आले. तसेच माध्यमांमध्येदेखील तिचे ब्रेकिंग म्हणून दाखविले गेले. गागामधील हा प्रगल्भपणा बघून काही बुद्धीवादी लोकांनी तिचे कौतुकही केल्याचे समजते. 

दरम्यान, या शॉपिंग सेंटरमधील कार्यक्रमाच्या विजेत्यांसाठी २५० दशलक्षहून अधिक डॉलरचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ही रक्कम देण्यात येणार आहे. पैसा सुंदरता आणि प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते. प्रेम आणि दया या जगात सुसंवाद निर्माण करण्याचे काम करते. मी जगात खूप फिरले आहे, त्यावरून जो अनुभव आला आहे, तेच मी बोलत आहे, असे तिच्या भाषणातील काही मुद्दे होते.  



बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासोबत लेडी गागा

Web Title: Gagney gave thoughtful speeches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.