सनाला हॉलीवूडचे तिकीट
By Admin | Updated: June 17, 2014 08:11 IST2014-06-17T08:11:59+5:302014-06-17T08:11:59+5:30
तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनाने हॉलीवूडच्या एका दिग्दर्शकासोबत काम करायला होकार दिला आहे.

सनाला हॉलीवूडचे तिकीट
बिग बॉस-६ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेल्या सना खानने सलमान खानच्या जय हो या चित्रपटातही काम केले आहे; पण त्यानंतर मोठा पडदा आणि छोट्या पडद्यावरूनही गायब झाली. आता मात्र ती हॉलीवूडमध्ये नशीब अजमावणार असल्याची बातमी आहे. सूत्रांनुसार तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनाने हॉलीवूडच्या एका दिग्दर्शकासोबत काम करायला होकार दिला आहे. सूत्रांनुसार सना या मालिकेत एका राणीची भूमिका निभावणार आहे. सूत्रांनुसार ती सध्या जीममध्ये जास्त वेळ घालवताना दिसते. तिला यातून मोठ्या अपेक्षा आहेत.