इतिहास युद्धानेच नव्हे, तर प्रेमकथांनीही गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2016 02:38 AM2016-10-05T02:38:57+5:302016-10-05T02:38:57+5:30

आपल्या इतिहासाबाबतचा साधा विचारदेखील मनात आल्यास राजा-महाराजांमध्ये घडलेल्या तुफान युद्धाचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो

History is not only from war, but also by love cathars | इतिहास युद्धानेच नव्हे, तर प्रेमकथांनीही गाजला

इतिहास युद्धानेच नव्हे, तर प्रेमकथांनीही गाजला

googlenewsNext

आपल्या इतिहासाबाबतचा साधा विचारदेखील मनात आल्यास राजा-महाराजांमध्ये घडलेल्या तुफान युद्धाचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळे इतिहास म्हणजे ‘युद्ध’ हीच धारणा आपली झाली आहे. वास्तविक, इतिहासाचा अभ्यास केल्यास अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आपला इतिहास जेवढा युद्धाच्या प्रसंगांमुळे गाजलेला आहे, तेवढाच प्रेम-कथांनीही गाजला आहे. या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्यास नक्कीच त्यांना त्या बघाव्याशा वाटतील, असे मत टीव्हीक्वीन एकता कपूर हिने व्यक्त केले. तिच्या आगामी ‘चंद्र-नंदिनी’ या नव्या ऐतिहासिक मालिकेच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी साधलेला संवाद...

मालिकेच्या शूटिंगसाठी वास्तविक स्थळांचा वापर केला गेल्याचे बोलले जाते?
नाही! मालिकेची शूटिंग ही बहुधा नियोजित सेटवरच केली जात असते. त्यामुळे मालिकेत बाहेरचे लोकेशन दिसेल ही केवळ चर्चा आहे. पाटणा येथे पाटलीपुत्र व मगध यांचे अस्तित्व होते. त्यामुळे मालिकेचा काही भाग या ठिकाणी चित्रित केला जाईल, अशी चर्चा रंगली होती; परंतु ही केवळ चर्चाच आहे. वास्तविक, कुठल्याही मालिकेचे शूटिंग हे नियोजित सेटवरच करणे अपेक्षित असते. बजेट व इतर बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी सेट हे एकमेव आॅप्शन निर्मात्यांसमोर असते.

ल्ल ‘सास-बहू’च्या मालिकानंतर थेट ऐतिहासिक विषयावर मालिका काढण्याची कल्पना कशी सुचली?
ल्ल ऐतिहासिक विषयावर मालिका करावी, असा विचार मी पूर्वीच केला होता. त्यातच मला ‘चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य’ या दोन इतिहास पुरुषांचे पूर्वीपासूनच आकर्षण राहिल्याने मी हा विषय निवडला. मालिकेत चंद्रगुप्त मौर्य या पात्राबरोबरच चाणक्य हे पात्रदेखील तेवढेच ताकदवान आहे. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या वीरगाथांबरोबरच त्यांची प्रेमकथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक ही प्रेमकथा प्रतिशोधाच्या भावनेने घडलेली असल्याने यामध्ये अनेक ट्विस्ट बघावयास मिळणार आहेत. मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सर्व कलाकारांच्या एकमेकांसोबत जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे हे शक्य झाले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची मला खात्री आहे.
ल्ल श्वेता बासू प्रसाद हिची निवड कशी केली?
ल्ल मी अगोदरच स्पष्ट करते, की श्वेता खूपच टॅलेन्टेड कलाकार आहे. त्यामुळे तिची निवड होणे स्वाभाविक होते. या भूमिकेसाठी १५० ते २०० स्त्री कलाकारांचे आॅडिशन घेतले गेले. त्यातून श्वेताची निवड झाली. आज ती मालिकेत मुख्य भूमिकेत असण्याचे एकमेव कारण म्हणजे तिच्यातील गुणवत्ता होय. श्वेताने यापूर्वी देखील ‘कहानी घर घर की’ या
मालिकेत काम केले आहे. तिच्याकडे अनुभव असल्याने तिने ही भूमिका समर्थपणे निभावली. माझ्या मते, ऐतिहासिक विषयावरील या मालिकेसाठी श्वेताची निवड योग्य आहे.
ल्ल मुख्य भूमिकेत असलेल्या रजत टोकस आणि दिग्दर्शक संताराम यांच्यात बिनसल्याचे समजते. यामुळे मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, काय सांगशील?
ल्ल मला असे वाटते, की आपण याचा फारसा विचार न करता मालिकेच्या सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करायला हवे. कंपनीत चार ते पाच दिग्दर्शक वेगवेगळ्या मालिकांवर काम करीत आहेत. त्यामुळे रजत आणि संताराम यांच्यातील वाद माझ्यादृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. रजत अतिशय चांगला कलाकार आहे. यापूर्वी देखील त्याने मायथोलॉजिकल भूमिका साकारली आहे. जोधा-अकबर या मालिकेत त्याने मुघल सम्राट अकबर याची भूमिका साकारली होती. त्यामुळे तो या भूमिकेसाठी अगदी योग्य होता. शिवाय त्याने त्याच्या भूमिकेला न्यायदेखील दिला आहे. श्वेता आणि रजत यांच्यातील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
ल्ल प्रेक्षकांची आवड बघता ऐतिहासिक मालिकेला कितपत पसंती दिली जाईल?
ल्ल यापूर्वी आलेल्या अनेक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळे ही मालिकादेखील प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. मुळात गेल्या एक वर्षापासून मी या विषयावर काम करीत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे मला या मालिकेपासून सर्वच पातळ्यांवर खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांच्या आवडी-निवडी जरी बदलल्या असल्या तरी, त्यांच्यासमोर चांगली कलाकृती मांडल्यास ते त्यांच्या नक्कीच पसंतीस उतरते. हाच प्रयत्न मी मालिकेच्या माध्यमातून केला.

Web Title: History is not only from war, but also by love cathars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.