हिमेशला प्रेक्षकांनी नाकारले

By Admin | Updated: March 15, 2016 00:20 IST2016-03-15T00:20:56+5:302016-03-15T00:20:56+5:30

हिमेश रेशमियाने संगीतकार म्हणून मिळविलेले यश व गायनात त्याला लाभलेले मर्यादित यश पाहता, पडद्यावर चमकायची त्याची जिद्द पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. सपेन्स थ्रिलर म्हणून बनविलेल्या

Himesh rejected the audience | हिमेशला प्रेक्षकांनी नाकारले

हिमेशला प्रेक्षकांनी नाकारले

- फिल्म बाजार
ट्रेड गुरू

हिमेश रेशमियाने संगीतकार म्हणून मिळविलेले यश व गायनात त्याला लाभलेले मर्यादित यश पाहता, पडद्यावर चमकायची त्याची जिद्द पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. सपेन्स थ्रिलर म्हणून बनविलेल्या हिमेश रेशमियाचा नवा चित्रपट ‘तेरा सुरूर’ने पहिल्या वीकेंडला सहा कोटींच्या जवळपास कमाई केली. ही कमाई सरासरीदेखील म्हणता
येणार नाही. ‘तेरा सुरूर’ची निर्मिती
टी-सीरिजची होती व त्याचे बजेट २० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले गेले. बॉक्स आॅफिसवर तर या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा नव्हत्याच, परंतु टी-सीरिजने सॅटेलाइट आणि
अन्य हक्क विकून आधीच स्वत:ला सुरक्षित करून घेतले होते, असे सांगितले जाते. याचा अर्थ, बॉक्स आॅफिसवर जास्तीच्या कमाईची कोणालाही अपेक्षा नव्हती. या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या ‘गोल्डन बाबा’ला पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी नाकारले.
मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे, तर प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जय गंगाजल’ने दुसऱ्या वीकेंडपर्यंत २५ कोटींचा गल्ला केला असला, तरी प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली नाही. २५ कोटींची कमाई करून ‘जय गंगाजल’ आता स्थिरावला आहे. ‘जुबान’, ‘तेरे बिन लादेन’चा दुसरा भाग आणि ‘अलीगढ’सारखे चित्रपट बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून कधीच बाहेर पडले आहेत.
तीन आठवड्यानंतरही बॉक्स आॅफिसवर टिकून राहण्यात सोनम कपूरच्या ‘नीरजा’ चित्रपटाने बाजी मारली आहे. आतापर्यंत त्याने ७० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. कोणत्याही मोठ्या हीरोशिवाय बनलेल्या ‘नीरजा’ने केलेली ही कमाई या वर्षीची आतापर्यंतची आश्चर्यकारक मानली जात आहे.
करण जोहरच्या कंपनीत तयार झालेला ‘कपूर अँड सन्स’ १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमाचा त्रिकोण बघायला मिळेल. ऋषी कपूर मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याची प्रसिद्धी भरपूर झाली आहे. ‘नीरजा’नंतर या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

Web Title: Himesh rejected the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.