हिमेश आता गँगस्टर!
By Admin | Updated: February 19, 2015 23:43 IST2015-02-19T23:43:32+5:302015-02-19T23:43:32+5:30
बॉलीवूडमधील गायक हिमेश रेशमिया पुन्हा अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या चित्रपटात तो गँगस्टरची भूमिका करणार आहे.

हिमेश आता गँगस्टर!
बॉलीवूडमधील गायक हिमेश रेशमिया पुन्हा अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या चित्रपटात तो गँगस्टरची भूमिका करणार आहे. दिग्दर्शक रवी राय यांच्यासोबत हिमेशने दोन चित्रपट साइन केले आहेत. एकदम दोन चित्रपट मिळाल्याने हिमेश खूपच उत्साही आहे. आणि या दोन्ही भूमिका उत्कृष्ट करता याव्यात, यासाठी तो आतापासूनच तयारीला लागला आहे.