बॉक्सऑफिसवर रईसच काबिल
By Admin | Updated: January 27, 2017 16:08 IST2017-01-27T15:53:48+5:302017-01-27T16:08:56+5:30
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा बहुचर्चित 'रईस' आणि हृतिक रोशनचा 'काबिल' यांच्यातील बॉक्सऑफीसवरील टफफाईटमध्ये रईसच काबिल झाल्याचे पहिल्या दोन दिवसाच्या कमाईवरुन दिसून आले आहे.

बॉक्सऑफिसवर रईसच काबिल
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा बहुचर्चित 'रईस' आणि हृतिक रोशनचा 'काबिल' यांच्यातील बॉक्सऑफिसवरील टफफाईटमध्ये 'रईस'च काबिल झाल्याचे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईवरुन दिसून आले आहे.
25 जानेवारी रोजी रईस आणि काबिल हे बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले असून या दोन सिनेमांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमे बिग बॅनर असल्याने त्यांच्या कमाईवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवशी काबिलपेक्षा रईस वरचढ ठरला आहे.
अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी रईसने पहिल्या दिवशी 20 कोटींहून अधिक तर दुसऱ्या दिवशी 26.30 कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे. तर काबिलने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केल्याचे ट्विट चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी केलं आहे.
दरम्यान, रईस आणि काबिल दोन्ही सिनेमांमध्ये थिएटर मिळवण्यात मोठी स्पर्धा दिसली. राकेश रोशन यांनी मोठ्या प्रमाणात स्क्रिन मिळवल्या. तर अॅडव्हान्स बुकिंगमध्येही रईसनेच बाजी मारल्याचे रिपोर्ट आहेत.