म्हणून "बाहुबली2"ला मिळाले अॅडल्ट सर्टिफिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 17:55 IST2017-05-16T17:55:30+5:302017-05-16T17:55:40+5:30
"देवसेना को किसी ने हाथ लगाया तो समझो बाहुबली की तलवार को हाथ लगाया" यासारख्या संवादाने बाहुबली-२ने देशातील प्रत्येकाचं मन जिंकले आहे

म्हणून "बाहुबली2"ला मिळाले अॅडल्ट सर्टिफिकेट
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - "औरत पर हाथ डालने वाले की उँगलियाँ नहीं काटते, काटते हैं तो गला" , "देवसेना को किसी ने हाथ लगाया तो समझो बाहुबली की तलवार को हाथ लगाया" यासारख्या संवादाने बाहुबली-२ने देशातील प्रत्येकाचं मन जिंकले आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवून या सिनेमानं जुने सगळे विक्रम मोडीत काढलेत. आबालवृद्धांना "बाहुबली"नं अक्षरशः याड" लावलंय. असं असताना, सिंगापूरमधील सेन्सॉर बोर्डानं "बाहुबली-2" ला "ए" सर्टिफिकेट देऊन सगळ्यांनाच चकित केले आहे. या सर्टिफिकेटचा अर्थ काय? तर हा चित्रपट १६ वर्षांखालील वयाचे लोक पाहू शकणार नाहीत. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. आता यामागे कारण काय तर एकाच गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन.
भारतीय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी बाहुबली2ला कुठल्याही कटशिवाय रिलीज होऊ दिले. पण सिंगापूरमध्ये हा चित्रपट प्रचंड हिंसात्मक असल्याचे मानले गेले. विशेषत: यातील अनेक युद्धाचे प्रसंग. ज्याप्रमाणे यातील सैनिकांना ठार मारलेले दाखवले गेले आहे, ते प्रचंड हिंसात्मक असल्याचे सिंगापूर सेन्सॉर बोर्डाचे मत आहे.
चित्रपटातील काही दृश्यं अंगावर येणारी, मनावर परिणाम करणारी आहेत. ती 16 वर्षांखालील मुलांनी पाहण्यायोग्य नाहीत, असं निरीक्षण नोंदवत सिंगापूर सेन्सॉर बोर्डानं बाहुबली-2 ला यूए प्रमाणपत्र नाकारलं आहे. या अजब तर्कटाद्वारे त्यांनी भारतीय सेन्सॉर बोर्डालाही मागे टाकल्याची खिल्ली सिनेप्रेमी उडवत आहेत.