दिशा करतेय हेरगिरी ?

By Admin | Updated: June 3, 2017 05:57 IST2017-06-03T05:57:38+5:302017-06-03T05:57:38+5:30

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले

Heading Spirits? | दिशा करतेय हेरगिरी ?

दिशा करतेय हेरगिरी ?

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे. दोघेही आपल्या नात्याबद्दल सीरिअस आहेत, असेही कळतेय. पण, अलीकडे दिशामुळे टायगर जाम वैतागला आहे. दिशाचे पझेसिव्ह नेचर टायगरसाठी अडचणीचे ठरत आहे. दिशाचा हा स्वभाव दोघांमधील वादाचे कारण बनत असल्याची खबर आहे. दिशा सतत टायगरवर वॉच ठेवते. काही दिवसांपूर्वी ती ‘मुन्ना मायकेल’च्या सेटवर जाऊन पोहोचली होती. टायगर त्याची को-स्टार निधी अग्रवालसोबत जरा जास्तच वेळ घाालवू लागला होता. ही गोष्ट उडत उडत दिशाच्या कानावर गेली आणि मग तिचे पझेसिव्ह नेचर समोर आले. निधीसोबतच्या टायगरच्या वाढत्या जवळीकीमुळे दिशा इतकी चिंतीत झाली की, हेरगिरी करायला अचानक चित्रपटाच्या सेटवर येऊन धडकली. टायगर व दिशा यांचे नाते आता बरेच पुढे गेलेय. टायगरच्या मॉम-डॅडनी या नात्याला संमती दिल्याचेही कळतेय. या दोघांनाही अनेकदा मुव्ही डेट व हॉलीडे एन्जॉय करताना बघितले गेलेय. दिशा व टायगरची पहिली भेट ‘बागी’च्या सेटवर झाली होती. श्रद्धा कपूरच्या आधी या चित्रपटात दिशाची वर्णी लागली होती. पण, ऐनवेळी दिशाचा पत्ता कट झाला अन् श्रद्धाची निवड झाली. पण तोपर्यंत दिशा व टायगर परस्परांच्या बरेच जवळ आले होते.

Web Title: Heading Spirits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.