कलाकारांच्या स्टंटबाजीला सलाम!

By Admin | Updated: November 12, 2016 06:16 IST2016-11-12T06:16:21+5:302016-11-12T06:16:21+5:30

चित्रपट पाहताना आपल्या लाडक्या कलाकाराला स्टंट करताना बघणे सगळ्यांनाच आवडते. कलाकारांना स्टंट करताना पाहून आपल्या मनातही प्रचंड उत्साह संचारतो.

Hats off to artists stunt! | कलाकारांच्या स्टंटबाजीला सलाम!

कलाकारांच्या स्टंटबाजीला सलाम!

चित्रपट पाहताना आपल्या लाडक्या कलाकाराला स्टंट करताना बघणे सगळ्यांनाच आवडते. कलाकारांना स्टंट करताना पाहून आपल्या मनातही प्रचंड उत्साह संचारतो. ‘वाह... काय स्टंट करतोय..!’ असे शब्द सहज आपल्या तोंडातून बाहेर पडतात. तो सीन आपण एन्जॉय करू लागतो. मात्र, तुम्हाला हे ठाऊक आहे का? आपला आवडीचा अभिनेता स्क्रीनवर सुरक्षितपणे स्टंट करताना दिसावा म्हणून अनेक स्टंटमनना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो किंवा दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. सध्या स्वत: स्टंट करणारे अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये आहेत. अक्षयकुमार, जॉन अब्राहम, अजय देवगन यासारखे अनेक कलाकार स्वत:चे स्टंट स्वत: करतात. भल्यामोठ्या इमारतीवरून उडी मारताना पडून जखमी होणे, आगीचे स्टंट करताना जखमी होणे, शरीराला गंभीर दुखापत होणे असे अनेक प्रकार स्टंटमनबरोबरच कलाकारांच्या बाबतीतही घडलेले आहेत. काल-परवा बंगळुुरूजवळ ‘मास्ती गुडी’ या कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन कन्नड अभिनेत्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोणत्या बॉलिवूडच्या कलाकारांना स्टंटबाजी करताना दुखापतीला सामोरे जावे लागले, यावर टाकूया एक नजर...


अक्षयकुमार
अक्षयकुमारला ‘बॉलिवूडचा खिलाडी’ म्हणून ओळखले जाते. तो त्याचा व्यायाम आणि स्टंट अतिशय काळजीपूर्वक करतो. मात्र,‘सिंग इज ब्लिंग’च्या शूटिंगदरम्यान आगीचे स्टंट करताना त्याचा पाय भाजून गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे दोन दिवसांच्या ब्रेकनंतर तो सीन पुन्हा शूट करावा लागला होता.

सलमान खान
‘बॉलिवूडचा सुपरस्टार’ सलमान खान हा सध्या मनालीत ट्यूबलाईटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘बजरंगी भाईजान’ या त्याच्या चित्रपटाला चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला; पण याच चित्रपटाच्या शूंिटंगदरम्यान सलमानच्या कानाला इन्फेक्शन झाले. यामुळे दोन दिवस शूटिंग खोळंबले होते.



रणवीर सिंह
‘बॉलिवूडचा बाजीराव’ म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’मुळे चर्चेत आला. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट झाला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घोड्यावरचा एक सीन शूट केला जात असताना तो खाली पडला. यात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याला ‘शोल्डर सर्जरी’ला सामोरे जावे लागले. ट्विटरवर त्याने त्याचा सर्जरी झाल्यानंतरचा फोटो शेअर केला होता.


अर्जुन कपूर
‘टू स्टेट्स’फेम अर्जुन कपूर सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला अ‍ॅक्टिव्ह असतो. सोनाक्षी सिन्हासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘तेवर’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी ‘प्रोलॅप्स्ड सर्व्हिकल डिस्क’ या आजाराचे निदान झाले. तसेच, ‘गुंडे’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अ‍ॅक्शन सिक्वेन्स शूट करताना पाठीचे दुखणे मागे लागले. त्याने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले आणि ‘फायंडिंग फॅनी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. यामुळे ते दुखणे एवढे वाढले, की संपूर्ण एक आठवडा आराम केल्यावरच त्याला शूटिंग करता आले.


रणदीप हुडा
‘हायवे’ फेम रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे. दीपक तिजोरी यांच्या ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला इजा झाली होती. ‘एमएमए फायटर’च्या भूमिकेत स्टंट करत असताना त्याच्या पायाच्या चार बोटांना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने त्याच्या पायाच्या एक्स-रेचा फोटोदेखील ट्विटरवर शेअर केला होता.


कॅटरिना कैफ
‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ, आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘फितूर’ चित्रपट आठवतोय ना? अभिषेक कपूरदिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग करत असताना कॅटचा घोड्यावरून फिरत असतानाचा एक सीन शूट करण्यात येत होता. तिचा बॅलन्स गेला अन् तिच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली. त्यानंतर ती बॉयफ्रेंड (आता एक्स बॉयफ्रेंड) रणबीर कपूरसोबत मालदीवला व्हेकेशन्ससाठी गेली. परतल्यानंतर पुन्हा तिने ‘फितूर’चे शूटिंग सुरू केले.

Web Title: Hats off to artists stunt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.