विद्याच्या फ्लॉप चित्रपटांची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: July 10, 2014 00:23 IST2014-07-10T00:23:59+5:302014-07-10T00:23:59+5:30

‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाचे भरपूर कौतुक झाले. त्यानंतर ती काम करत असणा:या चित्रपटाची खूप हवाही निर्माण व्हायला लागली.

The hat-tricks of Vidya's flops | विद्याच्या फ्लॉप चित्रपटांची हॅट्ट्रिक

विद्याच्या फ्लॉप चित्रपटांची हॅट्ट्रिक

अनुज अलंकार - मुंबई
‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाचे भरपूर कौतुक झाले. त्यानंतर ती काम करत असणा:या चित्रपटाची खूप हवाही निर्माण व्हायला लागली. त्या वेळी वेगळ्या कथानकामुळे ‘कहानी’ चित्रपट हिट ठरला. त्यानंतर मात्र विद्याच्या चित्रपटांना उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. असे असूनही चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी विद्याच्या वलयाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. मात्र त्याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी जासूस’ने विद्याला धक्का दिला. हा चित्रपट हिट होईल, अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती. प्रदर्शित झाल्यानंतरच्या 4 दिवसांत फक्त 8 कोटींची कमाई करत हा चित्रपट वर्षभरातल्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झाला. त्याआधी आलेल्या ‘घनचक्कर’ आणि ‘शादी के साइड इफेक्ट’ या चित्रपटांचेही हेच चित्र होते. ‘घनचक्कर’मध्ये विद्याची जोडी इमरान हाश्मीसोबत होती. पण वाईट कथानकामुळे चित्रपट फ्लॉप ठरला. तर ‘शादी के..’ मध्ये फरहान अख्तरसारखा संवेदनशील कलाकार असूनही चित्रपट प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे या दोन वर्षाच्या 
काळात विद्याने अपयशाची हॅट्ट्रिक साधली आहे, असेच म्हणणो योग्य ठरेल. 
‘डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’नंतर प्रयोगात्मक चित्रपटांबाबत विद्याने घेतलेले निर्णय चुकत आहेत. याबाबतीत  चित्रपट विश्लेषक विनोद मिरानी म्हणाले की, ीप्रधान चित्रपट प्रत्येक वेळी चालतीलच या भ्रमात विद्या होती. तो भ्रम या तीन चित्रपटांनी दूर केला. 
‘डर्टी पिक्चर’ आणि कहानीचे विषय प्रभावी होते. त्यात विद्याने उत्कृष्ट अभिनय केला. पण हे चित्रपट फक्त विद्याच्या अभिनयामुळे यशस्वी झाले असे मानणा:या लोकांनाही आता खरे काय ते समजले. यावर कहानी चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय घोष म्हणतो की, विद्याच्या अभिनय क्षमतेबाबत कोणालाही शंका नाही. विद्या आजच्या काळातल्या प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. हिट-फ्लॉपची मालिका बॉलीवूडमध्ये सुरूच असते.  
 
च्2क्14 - बॉबी जासूस - फ्लॉप
च्2क्14 - शादी के साइड इफेक्ट - फ्लॉप
च्2क्13 - घनचक्कर - फ्लॉप
च्2क्12 - कहानी - हिट
च्2क्11 - डर्टी पिक्चर - सुपरहिट
च्2क्1क् - इश्किया - हिट
च्2क्क्9 - पा - हिट
च्2क्क्8 - किस्मत कनेक्शन - फ्लॉप
च्2क्क्8 - हल्ला बोल - फ्लॉप
च्2क्क्7 - भूलभुलैया - फ्लॉप
च्2क्क्7 - हे बेबी - हिट
च्2क्क्7 - एकलव्य - फ्लॉप
च्2क्क्7 - सलाम-ए-इश्क - फ्लॉप
च्2क्क्7 - गुरू - सरासरी
च्2क्क्6 - लगे रहो मुन्नाभाई - सुपरहिट
च्2क्क्5 - परिणीता - हिट
 
कोणत्याही प्रकारच्या उलटसुलट चर्चेचा माङया कामावर परिणाम होणार नाही. जे चित्रपट करावे अशी माझी मनापासून इच्छा असेल त्याच चित्रपटात मी काम करते. बॉक्स ऑफिसची चिंता मी कधीही केली नाही.  
- विद्या बालन

 

Web Title: The hat-tricks of Vidya's flops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.