मराठमोळ्या हर्षवर्धन राणेचे बॉलीवूडमध्ये पदार्पण...
By Admin | Updated: January 24, 2016 01:51 IST2016-01-24T01:51:38+5:302016-01-24T01:51:38+5:30
सध्या बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या कलाकारांची चलती आहे. नुकतेच ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री पूजा हेगडे हिने सुपरस्टार हृतिक रोशनसोबत पदार्पण केले असताना

मराठमोळ्या हर्षवर्धन राणेचे बॉलीवूडमध्ये पदार्पण...
सध्या बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या कलाकारांची चलती आहे. नुकतेच ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री पूजा हेगडे हिने सुपरस्टार हृतिक रोशनसोबत पदार्पण केले असताना, त्या पाठोपाठ मूळचा ग्वाल्हेरचा असलेला, पण आजोबा मात्र रत्नागिरीचे असल्यामुळे मराठी असणारा मराठमोळा अभिनेता हर्षवर्धन राणे आता ‘सनम तेरी कसम’ या बॉलीवूड चित्रपटातून पदार्पण करीत आहे. हर्षवर्धन हा काही वर्षांपूर्वी मुंबई-पुणे येथे वास्तव्यास असल्यामुळे त्याला तोडकीमोडकी मराठीदेखील बोलता येते. सध्या या चित्रपटातील
त्याचे अरिजितच्या आवाजातील ‘तेरा चेहरा’ या गाण्याला तरुणांनी उचलून धरले आहे. त्यामुळे या मराठी कलाकारांचे यश पाहता, बॉलीवूडमध्येदेखील मराठी कलाकार स्टार होण्यास वेळ लागणार नाही. बॉलीवूडमध्ये या दोघांनी जरी एंट्री केली असली, तरी मराठी चित्रपटांचे विषय पाहता, मराठीमध्ये काम करण्याची इच्छादेखील त्या दोघांनी व्यक्त केल्याचे समजते. आता अभिनेत्री पूजा हेगडे व अभिनेता हर्षवर्धन राणे दोघेही बॉलीवूडमध्ये मराठी माणसाचं नाव उज्ज्वल करतील, याबाबत शंकाच नाही.