नवीन कथेत हॅरी पॉटर लवकरच चाहत्यांच्या भेटीला
By Admin | Updated: July 10, 2014 17:04 IST2014-07-10T17:04:58+5:302014-07-10T17:04:58+5:30
चाहत्यांच्या मनावर जादू करायला हॅरी पॉटर पुन्हा नव्या कथेच्या स्वरुपात येत आहे.

नवीन कथेत हॅरी पॉटर लवकरच चाहत्यांच्या भेटीला
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - चाहत्यांच्या मनावर जादू करायला हॅरी पॉटर पुन्हा नव्या कथेच्या स्वरुपात येत आहे. २००७ पासून जगभरातील मुलांच्या मनावर जादू करणारा बाल जादूगार हॅरी पॉटर या कथेच्या लेखिका जे.के रॉलिंग यांनी हॅरी पॉटरची आणखी एख नवी मालिका जगभरातील चाहत्यांपूढे मांडायचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांची ही कादंबरी वाचकांच्या भेटीला येणार आहे. जे.के. रॉलिंग यांनी लिहलेल्या हॅरी पॉटर या कथानकाचे आत्तापर्यंत सात भाग प्रसिद्धृ झआल आहेत. तसेच त्यांच्यावर निघालेले चित्रपटही उल्लेखनीय होते. हॅरी इतक्या पुरताच मर्यादीत राहिला नसून त्याच्या नावाने निघालेले व्हिडिओ गेम्सही तितकेच प्रसिद्ध झाले आहेत.