​गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हाफ तिकीट’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2016 12:54 PM2016-06-03T12:54:14+5:302016-06-03T18:24:14+5:30

गोवा फिल्म फेस्टिव्हल आजपासून (३ जून) सुरु होत असून यामध्ये विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचबरोबरीने प्रदर्शनाच्या ...

'Half Ticket' in Goa Film Festival | ​गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हाफ तिकीट’

​गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हाफ तिकीट’

googlenewsNext
वा फिल्म फेस्टिव्हल आजपासून (३ जून) सुरु होत असून यामध्ये विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचबरोबरीने प्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलरची झलक गोवा फिल्म फेस्टिव्हलच्या शुभारंभाला पहायला मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते ‘हाफ तिकीट’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड, निमार्ते नानूभाई जयसिंघानी, कलाकार प्रियांका बोस बालकलाकार शुभम मोरे व विनायक पोतदार उपस्थित राहणार आहेत.

सयंकाळी ६ वाजता या कार्यक्रमात रंगत येणार असून त्यानंतर निवड झालेल्या चित्रपटांचे स्क्रीनिंग होईल. 
‘हाफ तिकिट’ चित्रपटात शुभम मोरे व विनायक पोतदार यांच्यासह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शक समित कक्कड ‘हाफ तिकीट’ च्या माध्यमातून लहान मुलांची अनोखी कहाणी मांडणार आहेत.  १५ जुलैला हाफ तिकीट आपल्या भेटीला येणार आहे.

Web Title: 'Half Ticket' in Goa Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.