'हाफ गर्लफ्रेंड'च्या शुटिंगला सुरुवात
By Admin | Updated: June 8, 2016 17:06 IST2016-06-08T16:42:26+5:302016-06-08T17:06:21+5:30
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या सर्वाधिक प्यॉपुलर असलेल्या कादंबरीवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात करण्यात आली. याबाबतची माहिती खुद्द चेतन

'हाफ गर्लफ्रेंड'च्या शुटिंगला सुरुवात
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ : प्रसिद्ध लेखक चेतन भगतची कादंबरी आणि चित्रपट हे आता समीकरण झालं आहे. त्यांच्या सर्वाधिक प्यॉपुलर कादंबरीवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात करण्यात आली. याबाबतची माहिती खुद्द चेतन भगत यांनी आपल्या ट्विटर अकाउंन्टवरुन दिली आहे. 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करत असून यामध्ये स्टारकास्ट अभिनेता अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर दिसणार आहेत. चेतन भगत यांच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांनी फोटोसेशन केले होते. तसेच, या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत असून हा चित्रपट २८ एप्रिलला पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
Finally, the story comes to life. Big day as #HalfGirlfriend begins shoot! @mohit11481@arjunk26@ShraddhaKapoorpic.twitter.com/qYcPc6fasd— Chetan Bhagat (@chetan_bhagat) June 8, 2016
'प्रेम' हा चेतनचा आवडता विषय, याच विषयाच्या भोवती 'हाफ गर्लफ्रेंड'च कथानक फिरते आहे. याकथेतील नायक बिहारचा एक तरुण आहे. तो देशातील सर्वात मोठ्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. पण त्याला इंग्रजी येत नसते. त्याच कॉलेजमधील एका मुलीवर त्याचे प्रेम जडतेया रियाच्या भुमीकेत श्रद्धा कपूर काम करणार आहे तर बिहारी मुलगा माधवच्या भुमीकेत अर्जुन कपूर असणार आहे.
यापूर्वी मोहितने वरुण धवन आणि किर्ती सेननला साईन केल्याची चर्चा होती. त्यानंतर सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिका करणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण शेवटी या भुमीकेसाठी अर्जुन कपूरची निवड करण्यात आली. नायिकेच्या नावांची बरीच चर्चा सुरू असताना किर्तीच्या जागी श्रध्दाची वर्णी लागली आहे. चेतन भगतच्या फाइव्ह पॉंइट समवन, वन नाईट ऍट कॉल सेंटर, द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ आणि टू स्टेट्स या पुस्तकावर आतापर्यंत चित्रपट आलेले आहेत. हाफ गर्लफ्रेंड बरोबरच रिव्होल्युशन 2020 या पुस्तकावर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा आहेत.