गोखल्यांची सूनही नाटकात
By Admin | Updated: December 28, 2014 00:18 IST2014-12-28T00:18:48+5:302014-12-28T00:18:48+5:30
होणार सून मी या घरची’ सिरीयलमधल्या गोखल्यांच्या घरातले एकामागून एक कलाकार रंगभूमीवर येत आहेत

गोखल्यांची सूनही नाटकात
‘होणार सून मी या घरची’ सिरीयलमधल्या गोखल्यांच्या घरातले एकामागून एक कलाकार रंगभूमीवर येत आहेत. पहिल्यांदा श्री म्हणजेच शशांक केतकरने आपल्या छोट्या आईसोबत म्हणजेच लीना भागवतसोबत नाटकात एंट्री घेतली. त्याच्या नावाचा फायदा नाटकाला झाला. त्यानंतर त्याच्या इतर आयाही नाटकात काम करीत आहेत. मग त्याची सिरीयलमधली आणि खऱ्या आयुष्यातली बायको तेजश्री प्रधान कशी मागे राहील. तीही लवकरच एका नाटकात काम करणार असून, ते लवकरच रंगभूमीवर येईल.