जेनेलिया दुसऱ्यांदा गरोदर?
By Admin | Updated: December 12, 2015 02:00 IST2015-12-12T02:00:07+5:302015-12-12T02:00:07+5:30
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख-डिसुजा ही जोडी मराठीतीलच नव्हे, तर बॉलीवूडमधीलही उल्लेखनीय जोडी आहे. दोघांनी त्यांच्या वैयक्तिक करिअरमध्ये भरारी घेतली.

जेनेलिया दुसऱ्यांदा गरोदर?
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख-डिसुजा ही जोडी मराठीतीलच नव्हे, तर बॉलीवूडमधीलही उल्लेखनीय जोडी आहे. दोघांनी त्यांच्या वैयक्तिक करिअरमध्ये भरारी घेतली. लग्न करून दोघेही अत्यंत सुखी जीवन जगत असून, ‘रियान’ या पहिल्या बाळाचा त्यांनी प्रथम वाढदिवसही साजरा केला. आता एका संभ्रमात सर्वजण आहेत की, जेनेलिया दुसऱ्यांदा गरोदर आहे का? जेनेलियाला काही चित्रपटांत घेण्यात आले होते, पण आता तिला होल्डवर ठेवण्यात आल्याचे कळते. बरं ही दुसरी गोड बातमी जर खरी असेल तर रितेश-जेनेलिया दोघांचेही अभिनंदन!