लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:03 IST2025-05-05T14:02:32+5:302025-05-05T14:03:25+5:30

"मी मुलीला याबद्दल सांगितल्यावर ती म्हणाली..." अभिनेत्रीने सांगितला किस्सा

gautami gadgil kapoor reveals she thought of giving sex toy to daughter on her 16 th birthday | लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

१९९९ साली आलेला 'बिंधास्त' हा मराठी सिनेमा आठवतोय का? अभिनेत्री शर्वरी जेमिनीस आणि गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil)  यांची महत्वाची भूमिका होती. गौतमी गाडगीळ नंतर हिंदी मालिकांमध्येही काम करत होती. 'घर एक मंदिर' मालिकेदरम्यान तिची ओळख राम कपूरशी झाली. ते प्रेमातही पडले. २००३ साली ते लग्नबंधनात अडकले. त्यांना सिया ही मुलगी आणि अक्स हा मुलगा झाला. नुकतंच गौतमीने सियाच्या १६ व्या वाढदिवसाचा किस्सा सांगितला.

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूर म्हणाली, "माझी मुलगी सिया १६ वर्षांची झाल्यावर मला तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती. काय गिफ्ट द्यावं याचा मी विचारच करत होते. मग माझ्या मनात आलं की मी तिला सेक्स टॉय देऊ शकते. व्हायब्रेटर देता येईल. मी तिला जेव्हा सांगितलं की मी तिला हे गिफ्ट द्यायचा विचार करतेय तेव्हा ती म्हणाली, 'आई, तुला वेड लागलंय का?'. मग मी तिला म्हणलं की, 'सिया, विचार कर अशा किती आई असतील ज्या मुलींना असं काहीतरी देतील. पण मी देतेय..माझ्या आईने जे माझ्यासोबत केलं नाही ते मी तु्झ्यासोबतही करु नये असं मला अजिबात वाटत नाही. तू सगळे अनुभव घ्यायला पाहिजे असं मला वाटतं."

ती पुढे म्हणाली, "अनेक स्त्रिया आयुष्यात याचा आनंदच घेत नाहीत. असं का जगायचं? आज माझी मुलगी १९ वर्षांची आहे. मी तेव्हा तिला असं काही गिफ्ट द्यायचा विचार केला याचं आज ती कौतुक करते. याबाबतीत ती माझा आदर करते. हे खूप भारी आहे. आता यावरुन मी खूप ट्रोल होणार आहे याची मला कल्पना आहे. पण माझ्या मुलीला याबद्दल आदर वाटतोय हे माझ्यासाठी खूप आहे."

Web Title: gautami gadgil kapoor reveals she thought of giving sex toy to daughter on her 16 th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.