गजेंद्र पुन्हा नाट्यपंढरीकडे़़़
By Admin | Updated: April 13, 2015 23:15 IST2015-04-13T23:15:24+5:302015-04-13T23:15:24+5:30
मराठी चित्रपटांत व्यस्त असणाऱ्या गजेंद्र अहिरेकडे बऱ्याच पटकथा तयार आहेत, अशी चर्चा नेहमी होत असते. पण यातल्या एका पटकथेचा उपयोग त्याने चक्क नाटकात करायचा ठरवला आहे.

गजेंद्र पुन्हा नाट्यपंढरीकडे़़़
मराठी चित्रपटांत व्यस्त असणाऱ्या गजेंद्र अहिरेकडे बऱ्याच पटकथा तयार आहेत, अशी चर्चा नेहमी होत असते. पण यातल्या एका पटकथेचा उपयोग त्याने चक्क नाटकात करायचा ठरवला आहे. तब्बल २० वर्षांनी रंगभूमीची ओढ वाटू लागलेल्या गजेंद्रने त्यातल्या एका पटकथेवर चक्क ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक लिहून काढले. एवढे करूनच तो थांबला नाही; तर त्याचे दिग्दर्शन करण्याचा विडाही उचलला आहे. आता या शेंगांची चव रूपेरी पडद्याऐवजी रंगभूमीवर दरवळणार आहे.