फ्रेंड्सची मकरसंक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 03:09 IST2016-01-17T03:09:35+5:302016-01-17T03:09:35+5:30
मकरसंक्रांतीच्या दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज झाले. त्यांपैकीच स्वप्निल जोशी व सचित पाटील या जोडीचा ‘फ्रेंड्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आपला चित्रपट कसा हिट होईल, यासाठी

फ्रेंड्सची मकरसंक्रांत
मकरसंक्रांतीच्या दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज झाले. त्यांपैकीच स्वप्निल जोशी व सचित पाटील या जोडीचा ‘फ्रेंड्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आपला चित्रपट कसा हिट होईल, यासाठी प्रत्येक टीम वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर सतत येण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक मार्केटिंगचा अनोखा फंडा फ्रेंड्स या चित्रपटाच्या कलाकारांनी मकरसंक्रांतीचा उत्साह साधून केला आहे. या टीमने चक्क एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन पतंग उडविले, तर इमारतीच्या टेरेसवर असल्याने स्वप्निल व सचितला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तर अभिनेत्री गौरी नलावडे हिने संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एका पतंगावर संदेश दिला, की ‘तीळगूळ घ्या, फ्रेंड्स बोला’.