फर्राटे मारके नाचो - सोनाक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 05:12 IST2015-07-16T05:12:56+5:302015-07-16T05:12:56+5:30
सो नाक्षी सिन्हा ही अभिनयासोबतच डान्सदेखील खूप सुंदर करते हे तर सर्वांना माहितीच आहे. ती लवकरच अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या ‘आॅल इज वेल’ चित्रपटात

फर्राटे मारके नाचो - सोनाक्षी
सो नाक्षी सिन्हा ही अभिनयासोबतच डान्सदेखील खूप सुंदर करते हे तर सर्वांना माहितीच आहे. ती लवकरच अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या ‘आॅल इज वेल’ चित्रपटात आयटम नंबर करताना दिसणार आहे. सध्या फक्त त्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. तिने यासंदर्भात ट्विटही केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘नाचना है तो फर्राटे मारके नाचो, वरना मत नाचो.’ या आयटम नंबरचे बोलही तसेच आहेत. संपूर्ण व्हिडीओ १६ जुलैला रिलीज होणार आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित चित्रपट ‘आॅल इज वेल’मध्ये अभिषेक, ऋषी कपूर, असिन आणि सुप्रिया पाठकही असणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याअगोदरही तिने ‘गो गो गो गोविंदा’मध्ये तिचे जलवे रसिकांना दाखवलेच आहेत.