‘अ फ्लाइंग जाट’

By Admin | Updated: October 28, 2015 00:04 IST2015-10-28T00:04:50+5:302015-10-28T00:04:50+5:30

‘अ फ्लाइंग जाट’द्वारे बॉलीवूडला लवकरच नवा ‘सुपरहीरो’ मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहेत.

'A Flying Jat' | ‘अ फ्लाइंग जाट’

‘अ फ्लाइंग जाट’

‘अ फ्लाइंग जाट’द्वारे बॉलीवूडला लवकरच नवा ‘सुपरहीरो’ मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहेत. या चित्रपटात टायगर श्रॉफ व जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असून, आंतरराष्ट्रीय अ‍ॅक्शन स्टार नॅथन जोन्स (मॅडमॅक्स फेम) खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. टायगरचा सुपरहीरोचा पोशाख यात खास आकर्षण आहे. युवकांच्या मनातील कल्पना लक्षात घेत त्याचे डिझाइन करण्यात आले आहे. टायगर श्रॉफच्या पर्सनॅलिटीला सूट होईल असा कॉस्चुम लॉस वेगासमध्ये बनविण्यात आला आहे. तब्बल ११ कॉस्चुमनंतर हा ड्रेस निवडण्यात आला आहे. हा सिनेमा युनिव्हर्सल अपील करेल, असा टायगरचा दावा आहे.

Web Title: 'A Flying Jat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.