VIDEO : मिस यूनिव्हर्स हरनाज आणि सुष्मितापेक्षाही अवघड होता लारा दत्ताचा फायनल राऊंडमधील प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:21 PM2021-12-14T17:21:20+5:302021-12-14T17:21:37+5:30

आज आम्ही तुम्हाला दाखवतो की केवळ हरनाज (Harnaaz Sandhu) नाही तर याआधी मिस यूनिव्हर्स खिताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेन(Sushmita Sen) आणि लारा दत्ता( Lara Dutta) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबतही दाखवणार आहोत, ज्यांचं उत्तर दिल्यावर त्यांनी खिताब मिळवला होता.

The final question that Harnaaz Sandhu, Sushmita Sen and Lara Dutta was asked in the grand finale to win miss universe crown | VIDEO : मिस यूनिव्हर्स हरनाज आणि सुष्मितापेक्षाही अवघड होता लारा दत्ताचा फायनल राऊंडमधील प्रश्न

VIDEO : मिस यूनिव्हर्स हरनाज आणि सुष्मितापेक्षाही अवघड होता लारा दत्ताचा फायनल राऊंडमधील प्रश्न

googlenewsNext

हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हे नाव आज भारतासोबत जगात चर्चेत आहे. ही भारतातील अशी सुंदरी आहे जिने ८० देशातून आलेल्या सुंदर तरूणींना मात देत 'मिस यूनिव्हर्स' (Miss Universe 2021) खिताब आपल्या नावावर केला. चंदीगढच्या हरनाजने आपल्या सौंदर्याने परिक्षकांचं मन जिंकलं, सोबतच फायनल राऊंडमध्ये विचारण्यात आलेल्या  प्रश्नाचंही तिने असं उत्तर दिलं की सगळेच खूश झाले. आज आम्ही तुम्हाला दाखवतो की केवळ हरनाज (Harnaaz Sandhu) नाही तर याआधी मिस यूनिव्हर्स खिताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेन(Sushmita Sen) आणि लारा दत्ता( Lara Dutta) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबतही दाखवणार आहोत, ज्यांचं उत्तर दिल्यावर त्यांनी खिताब मिळवला होता.

प्रश्नाच्या उत्तराने हरनाजला मिळवून दिला विजय

हरनाजला विचारण्यात आलं की, 'तु तरूणींना काय सल्ला देशील की, रोजच्या लाइफमध्ये प्रेशरसोबत कसं डील करा़यचं? यावर २१ वर्षीय हरनाजने सांगितलं की, 'मला वाटतं की, आजच्या काळात ज्या तरूणांना प्रेशरचा सामना करावा लागत आहे त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवावा. हे त्यांनी लक्षात ठेवावं की ते यूनिक आहेत आणि हीच बाब तुम्हाला सुंदर बनवते. स्वत:ची तुलना इतरांची करणं बंद करा आणि जगात जे काही होत आहे त्या महत्वाच्या गोष्टींवर बोला. मला वाटतं या गोष्टी आहेत ज्या समजून घेतल्या पाहिजे. बाहेर निघा आणि आपल्याबद्दल बोला. कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे लीडर आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचा आवाज आहात. मी स्वत:वर विश्वास ठेवते आणि त्यामुळेच मी आज इथे उभी आहे. धन्यवाद'.

सुष्मिता सेनला काय विचारला होता प्रश्न?

१९ वर्षीय सुष्मिता सेनला फायनल राऊंडमध्ये विचारण्यात आलं होतं की, जर तुमच्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही असेल तर तुला काय अॅडव्हेंजर करायला आवडेल? यावर सुष्मिता म्हणाली होती की, 'माझ्यासाठी अॅडव्हेंचर ते असेल जे मी आतून एन्जॉय करू शकेल. जर माझ्याकडे पैसे आणि वेळ असेल तर मला लहान मुलांसोबत वेळ घालवणं आवडेल. मी हे नाही म्हणत आहे की लहान मुलं शहरातीलच असतील. ते कुठलेही असू शकतात. मला लहान मुलांसाठी काही करायचं आहे. त्यामुळेच मला त्यांच्यासोबत वेळ घालवून एन्जॉय करावं वाटेल. त्यांच्यासोबत मी बाहेर जाणार आणि वेळ घालवणार. धन्यवाद'.

लाराला विचारण्यात आलेला प्रश्न

हरनाजआधी २१ वर्षाआधी लारा दत्ताने मिस यूनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. २२ वर्षीय लारा दत्ताला फायनल राऊंडमध्ये विचारण्यात आलं होतं की, 'इथून बाहेर आता एक विरोध प्रदर्शन सुरू आहे. ज्यात म्हटलं जात आहे की, मिस यूनिव्हर्स स्पर्धा ही महिलांचा अपमान आहे. तुम्ही त्यांना कसं समजवाल की ते चुकीचे आहेत? हा प्रश्न फारच अवघड होता. यावर लाराने दिलेलं उत्तर ऐकून परिक्षक मंडळी खूश झाले होते.

लारा म्हणाली होती की, 'मला वाटतं की, मिस यूनिव्हर्ससारख्या स्पर्धा आम्हा तरूण महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे. जेणेकरून आम्ही त्या क्षेत्रात पुढे जाऊ शकू, मग तो बिझनेस असो, आर्म्ड फोर्स किंवा राजकारण असो. इथे आम्हाला आमची चाईस आणि विचारांची आवाज मजबूत करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो. आम्हाला मजबूत बनवतो आणि इंडिपेंडेंट बनवतो. ज्या आज आम्ही आहोत'.

Web Title: The final question that Harnaaz Sandhu, Sushmita Sen and Lara Dutta was asked in the grand finale to win miss universe crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.