नायिकाप्रधान चित्रपटांची चलती

By Admin | Updated: September 18, 2014 01:10 IST2014-09-18T01:10:21+5:302014-09-18T01:10:21+5:30

बॉलीवूडचे चित्रपट हे साधारणपणो नायकाभोवती फिरणारे असल्याचे मानले जाते. मोठमोठे अभिनेते घेऊन केलेल्या बिग बजेट चित्रपटात नायिका फक्त ग्लॅमरची गरज भागवतात.

Filmmaking Moving Movies | नायिकाप्रधान चित्रपटांची चलती

नायिकाप्रधान चित्रपटांची चलती

अनुज अलंकार- मुंबई
बॉलीवूडचे चित्रपट हे साधारणपणो नायकाभोवती फिरणारे असल्याचे मानले जाते. मोठमोठे अभिनेते घेऊन केलेल्या बिग बजेट चित्रपटात नायिका फक्त ग्लॅमरची गरज भागवतात. त्यांचे कथेशी काही घेणो-देणो नसते. गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकही असे चित्रपट पाहण्यास सरावले आहेत. मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार आठवडय़ांत तीन नायिकाप्रधान चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यात बॉलीवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींनी भूमिका केल्या आहेत. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा ‘खूबसूरत’ या चित्रपटातही सोनम कपूर प्रमुख भूमिकेत आहे. त्याआधी ‘क्रिएचर’, ‘मेरी कॉम’, ‘मर्दानी’ या चित्रपटांमध्येही बिपाशा बासू, प्रियंका चोपडा, राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे यापैकी कोणत्याही चित्रपटात एकही मोठा अथवा ओळखीचा अभिनेता नव्हता.  चित्रपटाची संपूर्ण मदार या अभिनेत्रींवर होती. तरीही त्यांनी बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवले. आगामी खूबसूरत चित्रपटाचेही असेच होईल, अशी अपेक्षा आहे. 
बॉलीवूडमध्ये बदलाची नांदी झाल्याचे अनेक लोकांचे म्हणणो आहे. या नायिकाप्रधान चित्रपटांची प्रसिद्धीही जोरदार करण्यात येऊन तो प्रदर्शित करण्यात येतो. अभिनेत्यांचे महत्त्व एकीकडे आहेच. मात्र आता चित्रपटांच्या मुख्य प्रवाहात नायिकाप्रधान चित्रपटांचे वाढत चाललेले महत्त्व नाकारून चालणार नाही, असे चित्रपटतज्ज्ञ मानतात. 
ट्ऱेड विश्लेषक विनोद मिरानी हा बदल चांगला असल्याचे मानतात. या चित्रपटांच्या कमाईवरून ते प्रेक्षकांना आवडत आहेत असेच दिसून येते. जरी या चित्रपटांची कमाई मोठय़ा अभिनेत्यांच्या चित्रपटाच्या तुलनेत जास्त नसली तरी नुकसान करणारीही नाही, असेही मिरानी म्हणाले. या बदलाचे श्रेय शहरातल्या मल्टिप्लेक्समधील तरुणाईला द्यावे लागेल. तसेच ज्या निर्मात्यांनी नायिकाप्रधान चित्रपट करण्याची जोखीम स्वीकारली, त्याची जोरदार प्रसिद्धी केली त्याचे श्रेय त्यांना आहेच. मात्र एका दशकापूर्वी अशा चित्रपटांसाठी व्यावसायिक चित्रपट निर्माते उत्साह दाखवत नसत. त्यामुळे साहजिकच नायिकाप्रधान चित्रपट कमर्शियल चित्रपटांच्या दृष्टिकोनातून बनत नसत. मात्र आता येत्या काळात या चित्रपटांमुळे बराच मोठा बदल घडून निर्माते नायिकाप्रधान चित्रपटांना प्राधान्य देतील, असा विश्वासही मिरानींनी व्यक्त केला. 
विश्लेषक एनपी यादव यांनी नर्गिस दत्त यांच्या मदर इंडिया चित्रपटाचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात मीना कुमारीपासून मधुबाला, नर्गिस, वहिदा रेहमान, नूतन यांनी नायकप्रधान चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. त्यानंतर स्मिता पाटील, शबाना आझमी यांनीही अशीच महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर 8क्च्या दशकात मसाला चित्रपटांची मागणी प्रचंड वाढल्याने नायिका मागे पडल्या, असे त्यांनी सांगितले. भारतीय चित्रपटाचे गणीत आणि सत्ता नायकाच्या स्टारडमभोवती फिरते हेच खरे आहे. नायिकाप्रधान चित्रपटांना चांगले दिवस असल्याचे मान्य जरी असले तरी आजही त्यांना घेऊन 2क्क् कोटी बजेट असलेला चित्रपट कोणी बनवणार नाही. मात्र या काळातल्या सुपरस्टारना घेऊन असे चित्रपट बनत असल्याचे वास्तवही नाकारता येणार नाही. त्यांनी एक मजेशीर गोष्टही सांगितली की, प्रियंका, राणी, बिपाशा यासारख्या अभिनेत्रींना कमर्शियल चित्रपटात अभिनयाचा फारसा वाव मिळत नव्हता. पण हा त्यांच्या मेहनत आणि नशिबाचा परिणाम म्हणायला हवा की त्यांना अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेची संधी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे चित्रपट पाठोपाठ प्रदर्शित झाले. त्यामुळेच त्यांचा दबदबा जास्त वाढल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Filmmaking Moving Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.