‘मसल्स’साठी घाम गाळतेय श्रद्धा
By Admin | Updated: July 22, 2014 23:41 IST2014-07-22T23:41:45+5:302014-07-22T23:41:45+5:30
रेमो डिसुजाच्या एबीसीडी या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘एबीसीडी-2’च्या रिमेकची तयारी सुरू आहे. हे या चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘मसल्स’साठी घाम गाळतेय श्रद्धा
रेमो डिसुजाच्या एबीसीडी या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘एबीसीडी-2’च्या रिमेकची तयारी सुरू आहे. हे या चित्रपटात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या नृत्यावर आधारित चित्रपट असल्याने श्रद्धाला तिचा स्टॅमिना वाढवण्याची गरज आहे, त्याशिवाय या चित्रपटात तिचे मसल्सही दिसण्याची आवश्यकता असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. त्यामुळे मस्कुलार बॉडी मिळवण्यासाठी सध्या श्रद्धा घाम गाळताना दिसते. श्रद्धा म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी खूप मेहनत करत आहे. कथेची मागणी असल्याने मला माझी बॉडी मेंटेन करणो गरजेचे आहे. त्यासाठी मी एक विशिष्ट डायट फॉलो करत आहे.’