फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:38 PM2022-08-04T19:38:24+5:302022-08-04T19:52:49+5:30
सलील कुलकर्णी, उर्मिला कोठारे, सुमीत राघवन आणि पुष्कर श्रोत्री यांच्या एकदा काय झालं सिनेमाचे प्रिमिअर नुकतंच पार पडले.
सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला एकदा काय झालं या चित्रपटाचा प्रिमिअर नुकताच पार पडला. ५ ऑगस्ट म्हणजेच उद्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रिमिअरला मराठी कलाविश्वातील कलाकारांसह बॉलिवूड फरहान अख्तर, जावेद अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी विशेष उपस्थिती लावली. ऐवढंच नाही तर हा सिनेमाचे कौतुक देखील केलं.
शिबानी म्हणाली, खूप दिवसांनी मी सुंदर मराठी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून मी भावूक झाले. चित्रपटाची कथा, संगीत सगळंचं छान जुळून आलंय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सुंदर काम केलंय. हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही तिने प्रेक्षकांना केलंय.
फरहान अख्तर म्हणाला, ''हा चित्रपट खूपच उत्कृष्ट आहे. त्याचसोबत भावूक करणारा आहे. सगळ्यांच कलाकरांनी उत्तम काम केलंय. बाल कलाकारचं तर विशेष कौतुक करण्यासारखं आहे, याचे श्रेय दिग्दर्शकाला द्याला हवं. संगीत तर फार सुरेख आहे. हा सिनेमा प्रत्येकाने आवर्जून बघावा असा आहे.''
जावेद अख्तर यांनी देखील या सिनेमाचे कौतुक केलं आहे. त्यांना 'एकदा काय झालं'ची कथा आवडली आहे. मनाला भावणारी कथा असल्याचे ते म्हणाले. चित्रपटाच्या संगीताचे देखील त्यांनी कौतुक केलं आहे.
एकदा काय झालं सिनेमात उर्मिला कोठारे, सुमीत राघवन, पुष्कर श्रोत्री आणि बालकलाकार भूमिका अर्जुन पुर्णपात्रेने साकारली आहे..