ऐश्वर्या साकारणार फॅनी खान ?

By Admin | Updated: June 6, 2017 14:20 IST2017-06-06T14:06:23+5:302017-06-06T14:20:55+5:30

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे

Fanny Khan to make Aishwarya? | ऐश्वर्या साकारणार फॅनी खान ?

ऐश्वर्या साकारणार फॅनी खान ?

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6- कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी "फॅनी खान" या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करण्याची ऐश्वर्याची पहिलीच  वेळ आहे. पण या सिनेमाविषयीची अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आळी आहे.  तसंच, ऐश्वर्या या सिनेमात फॅनी खानच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार की दुसरी कोणती भूमिका साकारणार हे स्पष्ट झालेलं नाही.
 
‘रुस्तम’ सिनेमाची निर्मिती करणारी क्रिअर्ज एण्टरटेंन्मेट ही निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे. राकेश यांचा शेवटचा सिनेमा ‘मिर्झिया’ हा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर या नवीन कलाकारांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानंतर तीन वर्षानंतर ‘मिर्झिया’हा सिनेमा रिलीज झाला . पण, ‘फॅनी खान’या सिनेमाची काही महिन्यातच घोषणा करण्यात आली आहे. 
 
करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात  ऐश्वर्या दिसली होती. ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर ब्रेक घेऊन मी आनंदी असून, आता मला खासगी आयुष्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं ऐश्वर्याने एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.  आता ती पुन्हा एकदा ऐश्वर्या तिच्या कामाकडे वळण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी ऐश्वर्याने ‘जझबा’, ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 
 

Web Title: Fanny Khan to make Aishwarya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.