बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा काश्मीरमध्ये
By Admin | Updated: December 8, 2014 00:43 IST2014-12-08T00:43:06+5:302014-12-08T00:43:06+5:30
बॉलीवूडची नवोदित सेक्सी आणि हॉट अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा काश्मीरमध्ये
बॉलीवूडची नवोदित सेक्सी आणि हॉट अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘आशिकी -२’मधील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे ही जोडी चर्चेत आली होती. अनेक कार्यक्रमांत दोघे एकत्रित सहभागी होत असत. तेव्हापासून दोघांत प्रेमाची खिचडी शिजत असल्याचे बोलले जात होते; परंतु आदित्य आणि श्रद्धा यांनी या चर्चेचे खंडन केले होते. आम्ही एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहोत, असा दावा त्यांनी वारंवार केला आहे. आदित्य हा सध्या काश्मीर खोऱ्यात ‘फितूर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा त्याला भेटण्यासाठी काश्मीरला गेली होती. ‘फितूर’च्या सेटवर आदित्यसोबत तिने बराच वेळ घालवला. ‘एबीसीडी- २’ हा श्रद्धाचा नवा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. वरुण धवन हा या चित्रपटात तिचा हीरो असेल.