रोज सूर्यनमस्कार : जॅकलीन

By Admin | Updated: September 15, 2014 04:56 IST2014-09-15T04:56:13+5:302014-09-15T04:56:13+5:30

सलमान खानसोबत ‘किक’ चित्रपटातून जोरदार भूमिका केलेल्या जॅकलीन फर्नांडिसला अभिनयाबरोबरच व्यायाम, आरोग्याची काळजी घेणे या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात

Everyday Suryanamaskar: Jacqueline | रोज सूर्यनमस्कार : जॅकलीन

रोज सूर्यनमस्कार : जॅकलीन

सलमान खानसोबत ‘किक’ चित्रपटातून जोरदार भूमिका केलेल्या जॅकलीन फर्नांडिसला अभिनयाबरोबरच व्यायाम, आरोग्याची काळजी घेणे या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. ती म्हणते की, माझे सौंदर्य, माझी त्वचा ही ईश्वराची देणगी आहे; पण मी याची काळजी घेतली नाही, तर प्रदूषण व मेकअपमुळे ती खराब होऊ शकते. त्यामुळे मी माझी त्वचा व केसांची विशेष काळजी घेते. ते नेहमी आरोग्यपूर्ण राहतील, याकडे माझे लक्ष असते. यासाठी वापरणारी सौंदर्यप्रसाधने नैसर्गिक घटकांची असतील, यावर माझा भर असतो, असेही तिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, आरोग्य व सौंदर्यासाठी मी दररोज सूर्यनमस्कार करते. याशिवाय मला दरवेळी नवनवीन प्रकारचे व्यायाम करायला आवडतात. मला किक बॉक्सिंग, फंक्शनल ट्रेनिंग, योगा, क्रॉसफिट आणि नृत्य असे व्यायामप्रकार आवडतात. जीममध्ये व्यायाम करताना मी लवकर कंटाळून जाते; पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पूर्ण व्यायाम होईल याची काळजी घेते. सूपपासून ज्यूसपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यपूर्ण पदार्थांचा माझ्या आहारात समावेश असतो. मसालेदार आणि तळलेले पदार्थ यांना मात्र माझ्या जेवणात स्थान नाही. श्रीलंकन फूड हा माझा विकपॉर्इंट असल्याचेही तिने सांगितले.

Web Title: Everyday Suryanamaskar: Jacqueline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.