एन्ट्री आधीच अॅक्सिडेंट
By Admin | Updated: January 4, 2015 23:55 IST2015-01-04T23:55:58+5:302015-01-04T23:55:58+5:30
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन या वर्षात बॉलीवूडमध्ये प्रवेश करीत आहे. मात्र या आधीच त्याचा अपघात झाल्याने त्याला आराम करावा लागत आहे.

एन्ट्री आधीच अॅक्सिडेंट
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन या वर्षात बॉलीवूडमध्ये प्रवेश करीत आहे. मात्र या आधीच त्याचा अपघात झाल्याने त्याला आराम करावा लागत आहे. हर्षवर्धन सध्या राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झियॉँ’ चित्रपटाचे राजस्थानात चित्रीकरण करीत आहे. या दरम्यान एका सीनमध्ये हर्षवर्धनला नायिकेसोबत बाईक चालवायची होती. मात्र राजस्थानातील वाळूत घसरून हर्षवर्धन पडला. त्याच्या पायाला व डोक्याला मार लागला असल्याने सध्या तो येथील हॉटेलमध्ये आराम करीत आहे.