मिळून चौघी जणींचा सक्षम लढा

By Admin | Updated: December 6, 2014 22:35 IST2014-12-06T22:35:16+5:302014-12-06T22:35:16+5:30

स्त्री विरोधी अत्याचाराबाबत समाजात कितीही जनजागृती केली जात असली, तरी ही वृत्ती मुळापासून नष्ट झालेली आढळत नाही.

Enough fight for fourfold | मिळून चौघी जणींचा सक्षम लढा

मिळून चौघी जणींचा सक्षम लढा

कँ डल मार्च
स्त्री विरोधी अत्याचाराबाबत समाजात कितीही जनजागृती केली जात असली, तरी ही वृत्ती मुळापासून नष्ट झालेली आढळत नाही. या वृत्तीमागची विकृत मानसिकता जोर्पयत बदलत नाही, तोर्पयत याविषयी काही ठोस, सकारात्मक घडणार की नाही, असा प्रश्नही विविध स्तरांवर चर्चिला जातो. अत्याचाराची एखादी घटना घडली की त्या वेळेपुरता हा प्रश्न ऐरणीवर येतो आणि काही दिवसांतच ती घटना विसरली जाते. विकृत मनांना हवा तेवढा धाक नसल्याने पुन:पुन्हा अशा घटना घडत राहतात. हे सगळे कुठे तरी थांबायला हवे, असा थेट संदेश ‘कॅँ डल मार्च’ हा चित्रपट देतो. समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासह समाजपुरुषाला खडबडून जागे करण्याचे काम हा चित्रपट करतो.
समाजप्रबोधन हे या चित्रपटाचे एक अंग असले, तरी या माध्यमाची गरज आणि त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन या चित्रपटाचे कथासूत्र बांधले आहे. महाविद्यालयीन सखीवर होणारा अत्याचार हा या कथेचा पाया असला, तरी ही केवळ सखीची गोष्ट नाही. कोणत्याही क्षेत्रत काम करणा:या स्त्रीला थोडय़ाबहुत प्रमाणात पुरुषांच्या विकृतीचा अनुभव येत असतो. हा चित्रपट या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे यातल्या सखीसह एक प्राध्यापिका, एका चॅनेलमध्ये काम करणारी पत्रकार आणि त्याचबरोबर गरीब वस्तीत  राहणा:या एका स्त्रीची ही कहाणी बनून जाते. या चौघींपैकी प्रत्येकीचे आयुष्य वेगळे आहे, परंतु त्यांच्यात एकच सामाजिक गोष्ट आहे आणि ती म्हणजे यातल्या प्रत्येकीने कोणत्या ना कोणत्याप्रकारे विकृत मनोवृत्तीचा सामना केला आहे. एक वेळ अशी येते की, अत्याचाराविरोधात लढा द्यायचाच, असा निर्णय घेतला जातो आणि या चौघी जणी या लढाईत सक्षमतेने उतरतात.
सचिन दरेकर याने चित्रपटाची कथा-पटकथा लिहिताना यातल्या चौघी जणींचे वास्तविक वेगवेगळे असलेले अस्तित्व उत्तमरीत्या एका समान धाग्यात गुंफले आहे आणि दिग्दर्शक सचिन देव यांनी हा गोफ प्रत्ययकारी पद्घतीने चित्रपटात उलगडला आहे. अतिरंजितपणा टाळत या दोघांनी मांडलेली गोष्ट नीट जमून आली आहे. प्रचारकी थाटाच्या भाषणामुळे चित्रपट जरा लांबला आहे. यातल्या चारचौघींनी आपल्या अभिनयाचे नाणो मात्र खणखणीत वाजवले आहे. शबाना या गरीब वस्तीतल्या स्त्रीची भूमिका स्मिता तांबेने कमालीच्या समरसतेने वठवली आहे. तिची शबाना वास्तव अभिनयाचे जिवंत उदाहरण कायम करणारी आहे. तेजस्विनी पंडितने साकारलेली प्राध्यापिका अनुरता ठोसपणो व्यक्त होते आणि तिचा अभिनयही लक्षात राहतो. मनवा नाईकची पत्रकार विद्याची भूमिका चांगली जमून आली आहे. यात सखी रंगवणा:या सायली सहस्रबुद्घे हिने पदार्पणातच आश्वासक काम केले असून तिने या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे. नीलेश दिवेकर याचा खलनायक  लक्षात राहण्याजोगा आहे. विकृत मनोवृत्तीला चपराक लगावत, स्त्रियांना अत्याचाराविरोधात लढण्यास बळ देणारा आणि समाजाला वेगळी दृष्टी देऊ पाहणारा हा चित्रपट म्हणजे काळाची गरज आहे, असेच म्हणावे लागेल.

 

Web Title: Enough fight for fourfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.