‘किलर’ डायलॉगचे डबस्मॅश

By Admin | Updated: December 17, 2015 01:47 IST2015-12-17T01:47:48+5:302015-12-17T01:47:48+5:30

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या फेमस डायलॉग्जनी इतिहास घडवला. आधीचा ‘अरे ओ सांबा’ असो की आताचा ‘आता माझी सटकली’ असे डायलॉग्ज तरुणाईच्या

Dubstash of 'killer' dialog | ‘किलर’ डायलॉगचे डबस्मॅश

‘किलर’ डायलॉगचे डबस्मॅश

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या फेमस डायलॉग्जनी इतिहास घडवला. आधीचा ‘अरे ओ सांबा’ असो की आताचा ‘आता माझी सटकली’ असे डायलॉग्ज तरुणाईच्या तोंडून हमखास ऐकू येतात. असाच एक डायलॉग सध्या तरुणांच्या तोंडून येता-जाता ऐकावयास मिळत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या बहुुुचर्चित चित्रपटातील ‘बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है अय्याशी नही’ या डायलॉगने सध्या धूम उडविली आहे. तर बाजीराव मस्तानीला टक्कर देणाऱ्या ‘दिलवाले’मधील ‘मुझे अपना चेहरा मत दिखाना’ हा डायलॉगही तरुणांना खूप भावत आहे. सध्या सोशल मीडियावर हे दोन्ही डायलॉग चांगलेच फेमस झाले असून अभिनेते या डायलॉग्जचे खास डबस्मॅश तयार करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवीत आहेत.

डबस्मॅश फॉर्म्युला हिट
चित्रपटगृहाबाहेर जेव्हा प्रेक्षक पडतात, तेंव्हा त्यांच्या दोनच बाबी लक्षात असतात. एक तर चित्रपटातील गाणी आणि दुसरे म्हणजे त्या चित्रपटातील डायलॉग. त्यातच हिट डायलॉगचे आयुष्य अधिक असल्याने निर्माते, अभिनेते हे डायलॉग प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. सध्या डबस्मॅश व्हिडिओ डायलॉग हिटचा फॉर्म्युला ठरत आहे. सध्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हे चित्र बघावयास मिळत आहेत. रणवीर सिंह प्रमोशननिमित्त जिथे जातो, तेथे उपस्थित सेलिब्रिटींच्या तोंडून ‘बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है अय्याशी नही’ हा डायलॉग वदवून घेतो. आतापर्यंत त्याने महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, रितेश देशमुख, अक्षय कुमार, कपिल शर्मा, राजकुमार हिरानी, अनुष्का शर्मा, सनी लियॉन, सौरभ गांगुली यांच्यासोबत चित्रपटातील डायलॉगवर डबस्मॅश व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहे. आयटम बॉम्ब सनी लियॉनने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील याच सुपरहिट डायलॉगचा डबस्मॅश व्हिडिओ बनविला आहे. जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सनी लियॉन अभिनेता रणवीर सिंह याची कॉपी करताना ‘बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है अय्याशी नही’ हा डायलॉग पुटपुटताना दिसत आहे. चित्रपटात रणवीरने दीपिकाला हा डायलॉग म्हटला आहे. या डायलॉगच्या वाढत्या लोकप्रियतेपासून खुद्द महानायक अमिताभ बच्चनही स्वत:ला दूर ठेऊ शकले नाहीत. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात या डायलॉगवर डबस्मॅश व्हिडिओ बनविला. तर प्रमोशनसाठी दिल्लीत गेलेल्या रनवीरसोबत क्रिकेटचा दादा असलेल्या सौरभ गांगुलीने देखील याच डायलॉगचा डबस्मॅश व्हिडिओ बनविला.

किंग खानही जोरात
‘दिलवाले’मधील ‘मुझे अपना चेहरा मत दिखाना’ या इमोशनल आणि सोशल मीडियावर हिट ठरत असलेल्या डायलॉगचा खुद्द किंग खानने खिल्ली उडविणारा डबस्मॅश व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत गोरव गेरा असून, जेव्हा शाहरुख हा डायलॉग म्हणतो तेव्हा गोरव चेहऱ्यावरचे केस सावरत शाहरुखला विचारतो ‘आता ठिक आहे का?’ गौरवच्या या उत्तरावर शाहरुख अतिशय फनी एक्सप्रेशन देतो. दोघांचा हा फनी डबस्मॅश सध्या सोशल मीडियावर धूम करीत आहे. काजोलने ‘मेरे ख्वाबो में जो आए’ या गाण्यावर डबस्मॅश बनविला होता. काहीही असो सध्या डबस्मॅश फॉर्म्युला चित्रपटातील डायलॉग हिटचा फॉर्म्युला ठरत आहे हे नक्की.

-  satish.dongare@lokmat.com

Web Title: Dubstash of 'killer' dialog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.