‘डबल सीट’ने केला ‘ब्रदर्स’चा शो रद्द
By Admin | Updated: August 20, 2015 01:53 IST2015-08-20T01:53:43+5:302015-08-20T01:53:43+5:30
आजवर हिंदी चित्रपटांची क्रेझ म्हणा किंवा सुपरस्टारचा सिनेमा म्हणा, आठवडेच्या आठवडे हे चित्रपट थिएटरमध्ये असतात. त्यासाठी इतर मराठी किंवा

‘डबल सीट’ने केला ‘ब्रदर्स’चा शो रद्द
आजवर हिंदी चित्रपटांची क्रेझ म्हणा किंवा सुपरस्टारचा सिनेमा म्हणा, आठवडेच्या आठवडे हे चित्रपट थिएटरमध्ये असतात. त्यासाठी इतर मराठी किंवा हिंदी चित्रपटांचे शो रद्द केल्याचे ऐकिवात आहे. मात्र एखाद्या मराठी चित्रपटासाठी चक्क हिंदी चित्रपटाचा शो रद्द केल्याचे कधी ऐकले आहे? तर आता ऐका... अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, वंदना गुप्ते आणि विद्याधर जोशी असलेल्या ‘डबल सीट’ चित्रपटासाठी हिंदी चित्रपट ‘ब्रदर्स’चा शो खास लोकाग्रहास्तव रद्द करण्यात आल्याचे उडत्या पक्ष्याकडून समजते.